-
चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर परिणाम होतो. अशात अनेक जण तासन्-तास एकाच जागी बसून काम करतात. (Photo : Freepik)
-
दिवसभर बैठं काम करणाऱ्यांना अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात पण अशा लोकांनी जर नियमित योगा केला तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. (Photo : Freepik)
-
यासंदर्भात योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालिनी यांनी ८-९ तास बसून काम करणाऱ्या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी योगासने सांगितले आहेत. (Photo : Freepik)
-
ही योगासने त्या करून दाखवत आहेत. ही योगासने आणि त्यांचे फायदे खालीलप्रमाणे : (Photo : Freepik)
-
सेतुबंधासन -पाठ व कंबरदुखीवर आराम मिळेल (Photo : Freepik)
-
सुचिरंध्रासन – पाठ व कंबरदुखीवर आराम मिळेल आणि आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होईल. (Photo : Freepik)
-
शलभासन – पाठ व कंबरदुखीवर आराम मिळेल आणि आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होईल. (Photo : Freepik)
-
अर्धमत्स्येन्द्रासन – पाठ व कंबरदुखीवर आराम मिळेल आणि आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होईल. (Photo : Freepik)
-
मृणालिनी यांनी yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजकाल बहुतांश लोकांचे काम बैठ्या स्वरूपाचे आहे त्यामुळे सतत ८-९ तास एकाच जागी बसून काम करावं लागतं व खूप वेळ एकाच अवस्थेत बसून राहिल्याने त्याचा वाईट परिणाम पाठीच्या कण्यावर होतो तर, ज्यांना बराच वेळ एका जागेवर बसून काम करावं लागतं अशा सगळ्यांसाठीच ही योगासने अतिशय उपयुक्त ठरणारी आहेत” (Photo : Freepik)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”