-
सध्या सर्वत्र थंडी जाणवू लागली आहे. हवामान बदलले की सर्दी,खोकला होणे सामान्य आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच हिवाळ्यात काही तरी गरमागरम पिण्याची सतत इच्छा होत असते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर चहा व्यतिरीक्त आणखीन चार पेय आहेत आहेत जे थंडीत तुम्हाला सर्दी, खोकल्यापासून बचाव करण्यास आणि शरीर उबदार ठेवण्यास पण मदत करतील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. आल्याचा चहा : आल्याचा चहा सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो. आल्याचा चहा शरीराला उबदार ठेवण्यास आणि घसा खवखवणे हा त्रास कमी करण्यास मदत करतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. गरम पाण्यात लिंबू आणि मध घाला : गरम पाण्यात लिंबू आणि थोडं मध हे मिश्रण थंडीची लक्षणे कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे. तसेच यामुळे पोट सुद्धा साफ राहते आणि अन्न पचनास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. हर्बल टी : हर्बल टी म्हणजे कॅमोमाइल, आले, पुदिना, गवती चहा यांचा वापर करून हर्बल टी बनवला जातो. तसेच याने सर्दी, खोकला आजारांपासून शरीराचे संरक्षण होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. थंडी असताना गरमागरम काही प्यायल्याने किंवा खाल्ल्याने घशाला खूप आराम मिळतो. सर्दी झालेली असताना गरमागरम चिकन, मटणचा रस्सा किंवा भाज्यांचे सूप प्यायल्यास खूप बरे वाटते. (फोटो सौजन्य: @Freepik)

तब्बल २७ वर्षानंतर ‘या’ ३ राशींचे चांगले दिवस सुरू! शनीच्या कृपेने मिळेल भरपूर पैसा, धन-संपत्तीचा लाभ अन् मोठं यश