-
आपण प्रसादाचा शिरा करतो तेव्हा वेलचीची आठवण होते. कुठल्याही गोड पदार्थात वेलची हवीच. ह्याच वेलचीला आयुर्वेदात औषध मानलं गेलं आहे. (फोटो : Freepik)
-
पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी वापरली जाणारी वेलची किती गुणकारी आहे, याची कल्पना तुम्हाला नाही. (फोटो : Freepik)
-
या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं. हिवाळ्यात तर तुम्ही वेलचीचे सेवन केलेच पाहिजे. चला जाणून घेऊयात थंडीत वेलची खाण्याचे फायदे. (फोटो : Freepik)
-
वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे स्नायूंना मजबूत करण्याचे काम करतात.वेलची खाल्ल्याने हृदयही निरोगी राहते. (फोटो : Freepik)
-
झोपेच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. वेलची खाल्ल्याने तोंडातील बॅक्टेरिया निघून जातात. (फोटो : Freepik)
-
पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की, त्याचे सेवन प्रमाणातच असावे. अतिसेवनाचे दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे पोटही खराब होऊ शकते. (फोटो : Freepik)
-
जेवणानंतर वेलची खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. यामुळे झोपेच्या समस्याही सुधारतात. त्यामुळे रात्री वेलची खाऊ शकता. वेलचीमुळे घशाची खवखवही बरी होते.(फोटो : Freepik)
-
जर आपण वेलची खाण्याच्या फायद्यांबद्दल बोललो तर वेलचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, ज्यात खालील गोष्टींचा समावेश होतो.(फोटो : Freepik)
-
वेलचीमध्ये आढळणारे घटक बघितले तर त्यात प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस आढळतात. जे निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात.(फोटो : Freepik)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक