-
मेकअप हा प्रत्येकाच्या आवडी निवडीचा प्रश्न आहे. काही लोकांना मेकअप करायला आवडतं तर काही लोकांना मेकअप करायला आवडत नाही. (Photo : Freepik)
-
काही असेही लोक असतात की ज्यांना मेकअप तर करायचा असतो पण मेकअप करता येत नाही. तुम्हालाही मेकअप करता येत नाही का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण फक्त १० स्टेप्सच्या मदतीने आज आपण परफेक्ट मेकअप कसा करायचा, हे जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
या दहा स्टेप्सच्या मदतीने तुम्ही परफेक्ट मेकअप करू शकता. अनेकांना प्रश्न पडतो की मेकअप कसा करायचा, कोणते प्रोडक्ट वापरायचे आणि कोणत्या क्रमानुसार हे प्रोडक्ट वापरायचे, चला तर जाणून घ्या दहा स्टेप्समध्ये मेकअप करण्याची योग्य पद्धत. (Photo : Freepik)
-
सुरुवातीला चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावा. त्यानंतर चेहऱ्यावर प्रायमर लावा. (Photo : Freepik)
-
त्यानंतर चेहऱ्याला नीट फाउंडेशन लावा. फाउंडेशन लावताना ब्रशचा वापर करा. त्यानंतर चेहऱ्याला कन्सिलर लावा. (Photo : Freepik)
-
त्यावर फाउंडेशन पावडर लावा किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावा. फार जास्त लावू नका. (Photo : Freepik)
-
नीट आयशॅडो लावा आणि नंतर आयलायनर लावा.त्यानंतर मस्कारा लावा. मस्कराने डोळे खूप सुंदर दिसतात (Photo : Freepik)
-
चेहऱ्याचे सौंदर्यात ओठ खूप महत्त्वाचे आहे. ओठावंर लिपस्टिक लावताना तुम्ही परिधान केलेल्या ड्रेसवर मॅच होईल असा रंग निवडा. (Photo : Freepik)
-
सर्वात शेवटी ब्लश, हायलायटर लावा ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईन. (Photo : Freepik)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल