-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी २ अगदी शुभ योग जुळून येणार आहे. यंदा १५ जानेवारी २०२४ ला मकर संक्रांतीचे पर्व साजरे केले जाणार आहे
-
तत्पूर्वी १४ जानेवारीच्या रात्रीपासून रवी व सिद्धी योग तयार होत आहेत. ज्योतिषांच्या माहितीनुसार यामुळे खालील पाच राशींना प्रचंड मोठा धनलाभ होण्याची चिन्हे आहेत.
-
वृषभ राशीला मकरसंक्रांती तिळगुळाप्रमाणे गोड साजरी करता येऊ शकते. आपल्या खासगी आयुष्यातील अडचणी दूर होऊ शकतात. आरोग्य सुधारल्याने कामावर लक्ष केंद्रित होईल ज्यामार्गे आर्थिक कक्षा रुंदावू शकतात
-
मिथुन राशीच्या मंडळींना करिअरमध्ये मोठी झेप घेता येऊ शकते. अडकून पडलेले पैसे व रखडलेले काम दोन्ही तुम्हाला हवे तसे मार्गी लागेल. आर्थिक स्थितीवर लक्ष्मी विष्णूची कृपा असू शकते
-
तूळ राशीच्या मंडळींचे अच्छे दिन मकरसंक्रांतीला सुरु होत आहेत. पैशांसह तुमच्या आयुष्यात पद- प्रतिष्ठा व मान सन्मान सुद्धा वाढू शकतो. चांगल्या बातम्या कानावर येतील, कुटुंबाच्या साथीने मोठे यश प्राप्त करू शकाल
-
वृश्चिक राशीच्या मंडळींना प्रवासाचे योग आहेत. नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जाणे होईल. नवीन लोकांशी जोडले जाल ज्यामुळे तुमच्या आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात, नवनवीन मित्रमैत्रिणी लाभतील
-
शनीच्या स्वामित्वाच्या कुंभ राशीसाठी मकरसंक्रांतीच्या पुढचा अवधी फायदेशीर ठरू शकतो. वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी प्रयत्न करत असल्यास तुमचे ग्रह साथ देतील. दान-धर्म करण्यासाठी सक्षम होऊ शकता
-
(टीप: वरील माहिती ही सामान्य ज्ञान व गृहीतके यांच्यावर अवलंबून आहे) (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नितीन गडकरींनी सरन्यायाधीश गवईंना दिला ‘आदेश’, त्यांच्याकडून लगेच मान्यही….