-    हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि रुक्ष होऊ लागते. त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    अशा वेळी त्वचा मुलायम ठेवण्यासाठी काही फेसपॅक तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त तीन घरगुती उपाय पाहू. (फोटो सौजन्य:@Freepik) 
-    हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याचे कमी सेवन. त्यामुळे जास्तीत जास्ती पाणी प्या. (फोटो सौजन्य:@Freepik) 
-    कॉफी फेस पॅक : त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी कॉफीचा फेस पॅक लावा. एक चमचा कॉफीमध्ये थोडे मध आणि दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. (फोटो सौजन्य:@Freepik) 
-    मध फेस मास्क : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठीही मधाचा फेस पॅक उत्तम ठरेल. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    एक चमचा गुलाबपाणी आणि लिंबाचा रस मधात मिसळून फेस पॅक बनवा आणि चेहऱ्याला लावा. (फोटो सौजन्य:@Freepik) 
-    तांदळाचे पीठ आणि मधाचा फेस पॅक : त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तांदूळ आणि मधाचा फेस पॅक लावा. एक चमचा तांदळाचे पीठ घेऊन त्यात एक चमचा मध आणि ओट्स बारीक करून तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. (फोटो सौजन्य:@Freepik) 
 
  आरशात पाहताना तोंडात ‘या’ जागी ‘अशा’ खुणा दिसल्यास कॅन्सरचा धोका; वेळीच ओळखा, दुर्लक्ष केलं तर मोजावी लागेल मोठी किंमत… 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  