-
काम कोणतेही असो प्रत्येकाला दिवसभर मेहनत करावी लागते. कामावर जाण्यासाठी सकाळी लवकर उठणे, प्रवास करणे, दिवसभर काम करणे आणि मग पुन्हा प्रवास करून घरी येणे आदी सर्व गोष्टी करताना अनेकांना शारिरीक थकवा जाणवतो. (फोटो सौजन्य: @freepik)
-
तसेच कोरोना नंतर बहुतेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतात. घरी एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळेही पाठ दुखते किंवा थकवा जाणवतो. (फोटो सौजन्य: @freepik)
-
तर ऑफिस किंवा कामावरुन घरी परत आल्यानंतर थकवा जाणवत असेल तर पुढील काही टिप्स तुमच्यासाठी उपयोगी ठरतील. (फोटो सौजन्य: @freepik)
-
अंघोळ करा : थकवा दूर करण्यासाठी शॉवर घेणे हा एक चांगला पर्याय ठरेल. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमचा मूडही चांगला होईल. (फोटो सौजन्य: @freepik)
-
चालण्यासाठी जा : ऑफिसचे काम संपल्यावर थोडा वेळ घराबाहेर चालायला जा. यामुळे तुमचा थकवा दूर होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: @freepik)
-
गाणी ऐका : तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यात थोडा वेळ घालवा. यामुळे तुमचा तणाव काही प्रमाणात कमी होईल. (फोटो सौजन्य: @freepik)
-
ध्यान (मेडिटेशन) करा : काही वेळ ध्यान करा. ध्यान करताना मनावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते. (फोटो सौजन्य: @freepik)
-
तुमच्या फोन आणि सोशल मीडियापासून काही काळ दूर राहा. हे तुमच्या डोळ्यांना आराम देतील. (फोटो सौजन्य: @freepik)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात