-
तूप हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा भाग आहे. भारतीय जेवणात तूपाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक पदार्थांमध्ये तूपाचा आवर्जून उपयोग केला जातो. (Photo : Freepik)
-
आपल्या आरोग्यासाठी सु्द्धा तूप अत्यंत फायदेशीर आहे.जे तूप आरोग्यासाठी चांगले आहे आणि तुम्ही त्याचा आहारात समावेश करताहेत, ते शुद्ध आहे की भेसळयुक्त? याविषयी तुम्ही कधी विचार केला का? (Photo : Freepik)
-
तुम्हाला माहिती आहे का आणि शुद्ध तूप कसे ओळखायचे? आज आपण या विषयी जाणून घेणार आहोत. काही खास ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही शुद्ध तूप आणि भेसळयुक्त तूप कोणते, हे सहज ओळखू शकाल. जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
तूप शुद्ध आहे की भेसळयुक्त हे जाणून घ्यायचे असेल तुम्ही हातावर तूप घासून हे ओळखू शकता. यासाठी हातावर तूप घासा जर हे तूप हातावर घासल्यानंतर लगेच विरघळत असेल तर समजायचे की हे तूप शुद्ध आहे पण विरघळण्यासाठी वेळ लागत असेल तर समजायचे की या तूपात भेसळ आहे. (Photo : Freepik)
-
तूप भेसळयुक्त आहे का, हे ओळखण्यासाठी तूप थोड्याप्रमाणात गरम करा. जर तूप लवकर विरघळत असेल आणि तपकीरी रंग येत असेल तर समजायचे की हे तूप शुद्ध आहे पण जर तूप गरम केल्यानंतर विरघळण्यासाठी वेळ लागत असेल आणि पिवळा रंग येत असेल तर तर समजायचे की तूप भेसळयुक्त आहे. (Photo : Freepik)
-
तूप शुद्ध आहे का हे ओळखण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. एक ग्लास पाणी घ्या त्यात एक चम्मच तूप टाका. (Photo : Freepik)
-
जर तूप पाण्याच्या वर तरंगत असेल तर समजायचे की तूप शुद्ध आहे पण पाण्याच्या तळाशी साचून राहिले तर समजायचे तूप भेसळयुक्त आहे. (Photo : Freepik)
-
मिठाच्या मदतीने सुद्धा तुम्ही तूप शुद्ध आहे का, हे ओळखू शकता. एका भांड्यामध्ये एक चम्मच तूप टाका आणि त्यात चिमुटभर मीठ घाला आणि त्यात थोडे हायड्रोक्लोरीक अॅसिड टाका. (Photo : Freepik)
-
अर्धा तासानंतर जर या तूपाचा रंग बदलला तर समजायचे की तूप भेसळयुक्त आहे पण रंग बदलला नसेल तर समजायचे की तूप शुद्ध आहे. (Photo : Freepik)

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती