-
शरीरात पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी आणि शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पेयांचा आणि पदार्थांचा आहारात समावेश करतो. (Photo: Freepik)
-
त्याचबरोबर शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी आवर्जून खाल्ले जाणारे फळ कलिंगड हे देखील शरीर थंड ठेवण्यास मदत होते. (Photo: Freepik)
-
कलिंगडामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे ते खूप फायदेशीर ठरते. (Photo: Freepik)
-
मात्र बरेच लोक कलिंगड खाणे टाळतात. कारण त्यात भरपूर प्रमाणात नैसर्गिक साखर असते. आज आम्ही तुम्हाला मधुमेह असणाऱ्यांनी कलिंगड खावे की नाही? याबद्दल माहिती देणार आहोत. (Photo: Freepik)
-
कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. अशा परिस्थितीत साखरेचे रुग्ण अधिक कलिंगड खाल्ले तर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल. म्हणून मधुमेह रूग्णांनी टरबूज मर्यादित प्रमाणात घ्यावा असा सल्ला डॉक्टर देतात. (Photo: Freepik)
-
मधुमेही रुग्ण कलिंगड माफक प्रमाणात खाऊ शकतात, कारण कलिंगडामध्ये भरपूर पाणी असते आणि त्यामुळे ग्लायसेमिक भार कमी होतो. (Photo: Freepik)
-
कलिंगड हे उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फळ आहे आणि त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. अशावेळी कलिंगड कमीत कमी प्रमाणातच खावे. (Photo: Freepik)
-
ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे आणि साखरेची पातळी झपाट्याने बदलते त्यांनी कलिंगड खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Photo: Freepik)
-
टाईप 2 मधुमेह असलेल्या व्यक्तीने कलिंगड किंवा इतर कोणत्याही फळाचा नाश्त्यात किंवा अन्नामध्ये समावेश केला असेल, तर त्याला हेल्दी फॅट आणि प्रोटीन यांच्यासोबत आहार संतुलित करावा लागेल.(Photo: Freepik)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”