-
कचऱ्याचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. घरात अनेक जुन्या वस्तू असतात ज्यांचा वापर केल्यानंतर आपण त्या लगेचच फेकून देतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर असे न करता या जुन्या वस्तूंचा आपण पुनर्वापर केला पाहिजे. पुढीलप्रमाणे तुम्ही काही जुन्या वस्तूंचा पुन्हा वापर करू शकता आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी हातभार लावू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. जुने कपडे : कपट्याच्या एका कोपऱ्यात जुन्या कपड्यांचा ढिगारा असतो. तर ही कपडे टाकून न देता या कपड्यांपासून फ्रेम, पॅचवर्क, ड्रेस किंवा उशी तयार करण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. सीडी : जुन्या सीडीपासून तुम्ही वॉल हँगिंग तयार कार शकतात. तसेच अनेक शोभेच्या वस्तू देखील तयार करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. ॲल्युमिनियम फॉइल : अन्न गरम व्हावे यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. पण, त्यानंतर तो फेकून दिला जातो . पण, तसे न करता गॅसचा गंज, मिक्सरचे जार साफ करणे, ऑक्साईड दागिने स्वछ करणे आदी अनेक गोष्टींसाठी तुम्ही ॲल्युमिनियम फॉइलचा उपयोग करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. प्लास्टिकची पिशवी : किराणा दुकानातून सामान आणण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीचा पुनर्वापर करा. ऑफिसला प्लॅटिकच्या पिशवीतून डब्बा घेऊन जा, सहलीला जाताना ओले कपडे, तुमचे फेसवॉश, ब्रश ठेवण्यासाठी या पिशव्यांचा उपयोग तुम्ही करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. प्लास्टिकच्या बाटली : अनेकदा आपण बाजारातून कोल्ड्रिंकच्या बाटली घेऊन येतो. यातील सरबत संपल्यावर त्या बॉटल आपण कचराकुंडीत फेकून देतो. तर असे न करता घरातील प्लास्टिकच्या बाटल्या पाण्याने स्वछ करून त्याचा उपयोग तुम्ही पेन-पेन्सिल किंवा बाथरूममध्ये ब्रश ठेवण्यासाठी आणि झाडे लावण्यासाठी सुद्धा करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
६. जुन्या मोठ्या खोक्यांपासून डॉल हाऊस, बांगड्या, दागिने ठेवण्यासाठी एक आकर्षक बॉक्स सुद्धा तुम्ही बनवू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
७. जुन्या टायर्सपासून झोपाळे तयार करा. याशिवाय सेंटर टेबल आणि झाडे लावण्यासाठीही टायरचा वापर करता येऊ शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल