-
नाश्त्याला रोज काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. वेळ कमी पण काहीतरी तर करायचं असतंच. अशा वेळेस घरात ब्रेड बटर असेल तर नाश्त्याचा प्रश्न सुटतो. ब्रेड बटर, ब्रेड जॅम, ब्रेडचे सॅण्डविच असे ब्रेडचे पदार्थ पटकन होतात आणि आवडीनं खाल्ले जातात. (Photo: Freepik)
-
ब्रेडचे पदार्थ कधी तरी खाणं योग्य असले तरी आरोग्याचा विचार करता रोज ब्रेड खाणं आरोग्यास अपयकारक आहे. ब्रेडवर तूप लावायचे की लोणी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जाणून घेऊयात, तूप लावायचे की लोणी. (Photo: Freepik)
-
बऱ्याच कारणांमुळे तूप आणि बटर खाणे टाळले जाते. आज आम्ही तुमच्या डोक्यातील हा संभ्रम कमी करण्यासाठी या दोन्हीमधले काही फरक आणि साधर्म्य सांगणार आहोत. (Photo: Freepik)
-
यानंतर तुमच्यासाठी या दोन्हींपैकी काय योग्य आहे? हे ठरवणे तुम्हाला सोपे जाईल. (Photo: Freepik)
-
तुपामध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण बटरपेक्षा थोडे जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांसाठी तुपापेक्षा बटर चांगला पर्याय ठरू शकतो. (Photo: Freepik)
-
लोणी आणि तूप हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ आहेत. लोण्यापेक्षा तुपाचा स्मोकिंग पॉईंट जास्त असतो, जो उच्च तापमानात शिजवण्यासाठी योग्य असतो. (Photo: Freepik)
-
तुपाचा हा गुण हिवाळ्यात फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय, तुपात दुधाचे घन पदार्थ नसल्यामुळे, ज्यांना लॅक्टोज किंवा दुग्धजन्य पदार्थांची समस्या आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः चांगले असू शकते. (Photo: Freepik)
-
लोणी जास्तवेळ फ्रेश राहत नाही. याचं कारण म्हणजे ते आंबट पदार्थापासून बनते. दही जरी आपण जास्तवेळ ठेवलं तरी ते जास्त आंबट होतं. (Photo: Freepik)
-
त्यामुळे लोणी काढल्यानंतर तुम्ही ते फ्रिजरला ठेऊ शकता. फ्रिजरमध्ये लोणी घट्ट बनतं आणि ते अनेक दिवस राहू शकतं. (Photo: Freepik)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल