-
डाळिंबाचा रस केवळ स्वादिष्ट नसून आरोग्यासाठी अनेक फायद्यांनीही उपयुक्त आहे.
-
जाणून घेऊया डाळिंबाच्या रसाचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायद्यांबद्दल
-
डाळिंबाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतात, हे अँटिऑक्सिडंट आपल्या शरीरातील पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.
-
डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका ही कमी होतो.
-
डाळिंबाचा रस हा हृदयासाठी फायदेशीर आहे आणि हे शरीरातील रक्तदाब कमी करण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
-
डाळिंबाच्या रसामध्ये अॅंटी-इन्फलामेटरी संयुगे असतात. ही संयुगे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.
-
डाळिंबाचा रस फायबरचा एक चांगला स्रोत आहे. फायबर आपल्या पाचन आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे.
-
डाळिंबाचा रस व्हिटॅमिन सीने समृद्ध असतो जो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओळखला जातो. हे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणून देखील कामं करतं.
-
डाळिंबाच्या रसामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर बायोएक्टिव्ह संयुगे जास्त प्रमाणात असल्यामुळे हे शरीरात कर्करोग विरोधी गुणधर्म तयार करतात.
-
डाळिंबाचा रस हा कर्करोग आणि अल्झायमर सारख्या अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी देखील मदत करतो. (सर्व फोटो: फ्रीपीक)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…