-
रमजानचा महिना सुरू आहे. या पवित्र महिन्यात लोक उपवास ठेवतात आणि संध्याकाळी खजूर खाऊन उपवास सोडतात. खजूर हे केवळ परंपरेनुसार महत्त्वाचे नसून ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. (Photo: Freepik)
-
खजूर खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि पचनक्रियाही चांगली राहते. त्यामुळे रमजानमध्ये खजूर खाणे उत्तम मानले जाते. (Photo: Freepik)
-
रमजाननिमित्त खजुराचे वेगवेगळे प्रकार बाजारात दाखल झाले असले तरी महागाईमुळे खजुरासह इतर सुक्यामेव्याचे देखील भाव काही प्रमाणात वाढले आहेत. (Photo: Freepik)
-
बाजारातील विविध प्रकारच्या खजूरांमधून योग्य प्रकारचे खजूर निवडणे कठीण असते. परंतु, एका सोप्या पद्धतीने तुम्ही बनावट आणि चांगल्या दर्जाचे खजूर सहज ओळखू शकता. (Photo: Freepik)
-
या छोट्याशा टीपने तुम्ही चांगले आणि पौष्टीक खजूर खरेदी करू शकता.आरोग्यासाठी चांगल्या दर्जाच्या खजूर निवडण्यासाठी त्याचा रंग काळजीपूर्वक पाहा. (Photo: Freepik)
-
सर्वोत्तम खजूर हा सहसा मऊ आणि गुळगुळीत असतो, त्याचा रंग एकसमान असतो आणि खूप कोरड्या किंवा जास्त चिकट नसतात. (Photo: Freepik)
-
बाजारात अनेक वेळा खजुरांना अधिक आकर्षक बनवण्यासाठी साखरेचा थर लावला जातो. म्हणूनच ओरिजनल खजूर ओळखण्यासाठी, त्यांना हलके दाबण्याचा प्रयत्न करा. (Photo: Freepik)
-
चांगल्या दर्जाचे खजूर मऊ असतात. रंग – निवडलेल्या खजूरांचा रंग एकसमान असावा. (Photo: Freepik)
-
सुगंध – नैसर्गिक गोडवा असतो आणि त्यांचा सुगंध ताजेपणा दर्शवतो.पॅकेजिंग – स्वच्छ आणि सीलबंद पॅकेजिंगमध्ये असलेले खजूर निवडा जेणेकरून तुम्ही ते दीर्घकाळ ठेवू शकता. (Photo: Freepik)

Video: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका? गुगल, मायक्रोसॉफ्ट कंपनीला नोकरभरती संदर्भात दिला इशारा