-
Social Seeker Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रानुसार काही अशा राशी असतात ज्यांच्या नशिबात सतत बदलाचे संकेत असतात. परिणामी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती फार काळ साथ देतीलच असे होत नाही.
-
पण अशा काही मंडळींना एकट्याने राहणे अजिबात आवडत नाही, परिणामी ते सतत कुणाला ना कुणाला आपल्या आयुष्यात घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रत्येक नवीन व्यक्तीकडून आपुलकी व प्रेमाची अपेक्षा असते. त्यांना स्वतःबाबत सुद्धा तेव्हाच विश्वास वाटतो जेव्हा इतर कुणी त्यांचे कौतुक करते
-
अनेकदा तर या मंडळींना इतरांच्या मदतीची गरज नसते पण सवय असल्याने त्यांचे परावलंबित्व वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार अशा राशी कोणत्या व त्यांचा स्वभाव कसा असतो हे पाहूया..
-
मिथुन रास: यांना चारचौघात राहण्याची आवड असते आणि त्यांचा स्वभावही मनमिळाऊ असतो. पण त्यांना एकट्याने राहायचं म्हटल्यास अस्वस्थ वाटू लागतं. त्यांना इतरांची संमती मिळवण्याची खूपच सवय असते.
-
मिथुन राशीची मंडळी ही उत्तम अनुयायी असतात पण त्यांना नेतृत्व करताना इतरांचा पाठिंबा लागतो स्वबळावर किंवा आत्मकेंद्रित होऊन निर्णय घेण्यास ते घाबरतात
-
तूळ रास: तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र, आता शुक्र हा मुळातच प्रेम व सौंदर्य, माधुर्य यांचा कारक आहे. यामुळे या राशीच्या स्वभावात गोडवा असतो. पण सतत इतरांसह जुळवून घेण्याचा, इतरांकडून चूक बरोबरचं प्रमाणपत्र मिळवण्याचा त्यांचा स्वभाव असतो. आणि हे प्रमाणपत्र देणाऱ्यांनाच ते आपल्या आयुष्यात आणू पाहतात.
-
तूळ राशीची मंडळी आपल्याला एकट्याला राहावं लागू नये यासाठी अनेकदा आपली तत्व बाजूला सारण्याची शक्यता असते. कुटुंबात त्यांच्या या स्वभावाचे कौतुक होत असले तरी कामाच्या ठिकाणी यामुळे नुकसान होऊ शकते.
-
कर्क रास: कर्क रास ही भावनाप्रधान असल्याने त्यांना माणसे जोडायला प्रचंड आवडतात, नातेवाईकांमध्ये सुद्धा ही मंडळी लाडकी असतात. त्यांचा हाच स्वभाव त्यांना प्रेमाच्या माणसांपासून दूर राहू देत नाही परिणामी त्यांना एकट्याने राहणे हा संघर्ष वाटू शकतो. आपल्याला प्रेम व आपुलकीने जपू शकतील अशा मंडळींना आयुष्यात आणण्यासाठी हे लोक झटत असतात
-
टीप: वरील माहिती ही गृहीतके व सामान्य ज्ञानावर आधारित असून यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”