-
स्वत:च्या चेहेऱ्यावरुन हात फिरवताना आपल्याला आपलाच स्पर्श नकोसा वाटतो आहे का? खरंतर हे असं अनेकजणींच्या बाबतीत नेहेमीच होतं. (फोटो: Freepik)
-
तर काहीजणींच्या बाबतीत गेल्या वर्षापासून घडत आहे. सतत हात सॅनिटाइझ करुन , वारंवार हॅण्डवॉशनं हात धुवावे लागत असल्यानं अनेकींचे हात सध्या रखरखीत, खडबडीत आणि कोरडे झाले आहेत. (फोटो: Freepik)
-
ही समस्या बहुतेक महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. वातावरण, अंगातील उष्णता, सतत भांडी घासून, कपडे धुवून , भाज्या चिरुन हातातला मऊपणा हरवल्याची तक्रार अनेकींची असते. हा हाताचा खडबडीतपणा कमी करण्याचे अगदी सोपे उपाय आहेत.(फोटो: Freepik)
-
तुमच्या हाताची त्वचा खरखरीत असेल तर गरम पाण्यात हात ठेवा आणि हात सुकवून त्यावर बदाम तेल लावा. तसेच हातावर जास्त रेषा असतील तर बटाट्याचा रस हातावर घासा. (फोटो: Freepik)
-
कोरफडीत पॉलिसॅचराइडस हा घटक असतो. त्यामूळे त्वचा आर्द्र राहाते आणि मऊ होते. हाताच्या मऊपणासाठी ताज्या कोरफडीच्या पात्यातून गर काढावा आणि तो हातास लावावा.(फोटो: Freepik)
-
बाहेर जाण्यापूर्वी हातावर सनस्क्रीन लावायला विसरू नका. हे सूर्यकिरणांचा तुमच्या हातावर परिणाम होण्यापासून प्रतिबंधित करते.(फोटो: Freepik)
-
थंड हवेमुळे हात सहज कोरडे होऊ शकतात. तुम्ही जेव्हाही बाहेर जाता तेव्हा हातमोजे घालून तुमचे हात सुरक्षित ठेवू शकता.(फोटो: Freepik)
-
या दोन्ही गोष्टींचा वापर करून तुम्ही हातांसाठी घरच्या घरी उत्तम स्क्रब तयार करू शकता. यासाठी मध्यम आकाराचे दोन बीट आणि अर्धी वाटी साखर लागेल.(फोटो: Freepik)
-
बीट किसून घ्या. त्यामध्ये साखर टाका. आता या स्क्रबने तुमच्या हातांना मसाज करा. साधारण एकेका हाताला ७ ते ८ मिनिट हलक्या हाताने मसाज करा.(फोटो: Freepik)

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक