-
तुम्ही अनेकदा असे लोक पाहिले असतील जे दिवसभर च्युइंगम चघळत राहतात. अनेक फ्लेवरचे च्युइंगम बाजारात उपलब्ध आहे. लहान मुले असो वा प्रौढ, च्युइंगम चघळणे ही आता लोकांची सवय झाली आहे. (फोटो – Freepik)
-
अनेकजण काही काम करताना तसेत व्यायाम करतानाही च्युइंगम चघळतात. पण हे खाणे आरोग्यासाठी अतिशय हाणीकारक आहे हे, तुम्हाला माहिती आहे का?(फोटो – Freepik)
-
याचे आपल्या शरिरावर काय परिणाम होतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण या सवयीबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.(फोटो – Freepik)
-
च्युइंगम चघळणे ही अनेकांची सवय झाली आहे. त्याचे तोटे आणि फायदे दोन्ही आहेत, फायद्यांबद्दल बोलायचे तर च्युइंगम चघळल्याने दात मजबूत राहतात आणि त्यांचा व्यायाम होतो. चिंगम खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.(फोटो – Freepik)
-
याशिवाय भूक कमी होते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. डबल चीन कमी करण्यासाठी बरेच लोक च्युइंगम चघळतात, कारण हा व्यायाम करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.(फोटो – Freepik)
-
जर तुम्हाला अभ्यास करताना झोप येत असेल तर तोंडात च्युइंगम चघळत ठेवा, यामुळे तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होईल आणि तुम्हाला झोप येणार नाही.(फोटो – Freepik)
-
जास्त वेळ च्युइंगम चघळल्याने पोटात गॅस तयार होतो आणि जर तुम्हाला सतत च्युइंगम चघळण्याची सवय असेल तर त्यामुळे पोट फुगण्याचीही तक्रार होऊ शकते. (फोटो – Freepik)
-
त्यासोबत च्युइंगम खाल्ल्याने डोकेदुखी होऊ शकते. वास्तविक, त्यात कृत्रिम तयार केलीली चव आणि प्रिझरव्हेटीव्ह असतात ज्यामुळे डोकेदुखीची समस्येत वाढ होते.(फोटो – Freepik)
-
च्युइंगम चघळल्यानंतर एखाद्याला जंक फूड खावेसे वाटते जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. च्युइंगममध्ये असलेल्या साखरेमुळे दातांच्या समस्या वाढण्याची शक्यता वाढते.(फोटो – Freepik)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS