-
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा गारेगार पदार्थ म्हणजे ‘आईस्क्रीम’. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कडक उन्हापासून आराम मिळावा म्हणून अनेक जण या गोड, क्रिमी पदार्थाचे सेवन करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, अनेक डॉक्टर दातांची कुठलीही शस्त्रक्रिया केल्यानंतर आईस्क्रीमचे सेवन करण्याचा रुग्णांना सल्ला देतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर डॉक्टर विजय कदम यांनी लोकसत्ता डॉट कॉमबरोबर संवाद साधताना याबद्दल माहिती सांगितली आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आईस्क्रीम हा एक लिक्विड पदार्थ (फूड) आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतर तुम्ही ते खाल्लं की, तुमच्या तोंडात जखम होत नाही. आईस्क्रीम तोंडात एक थंडगार (चिल्ड) इफेक्ट देते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
म्हणजेच जर कधी शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमच्या तोंडात रक्तप्रवाह सुरू झाला आणि तुम्ही आईस्क्रीम खाल्ले तर रक्तप्रवाह थांबण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दुसरे म्हणजे आईस्क्रीम शरीरासाठीसुद्धा चांगले असते. यामुळे तुम्हाला पोषकतत्वे (Nutrients) मिळतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जेव्हा एखादा रुग्ण दात काढतो किंवा एखादी शस्त्रक्रिया करतो तेव्हा खाण्या-पिण्याच्या बाबतीत काही नियम पाळावे लागतात. तुम्ही शस्त्रक्रिया केल्यानंतर गरम, कडक पदार्थ लगेच खाऊ शकत नाही, कारण यामुळे तुमच्या तोंडात रक्तप्रवाह होण्याची शक्यता असते. त्यामुळे आईस्क्रीम खाण्याचा सल्ला दिला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
रुग्णांना नेहमी वॅनिला आईस्क्रीम खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण हे आईस्क्रीम प्लेन असते. इतर फ्लेवर्सच्या आईस्क्रीममध्ये ड्रायफ्रुटस किंवा काही टोकदार पदार्थ असतात, जे तोंडात हानी पोहचवू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case