-
मेकअप करायला अनेक तरुणींना आवडते. कारण मेकअपमुळे चेहऱ्याचे सौंदर्य आणखी वाढते आणि तुम्ही नेहमीपेक्षा आणखी सुंदर दिसता. पण उन्हाळ्यात घामच्या धारा आणि चिकटपणामुळे मेकअप करणं नकोसे वाटते.
-
कारण यादिवसात केलेला मेकअप घामामुळे खराब होऊ लागतो. अशा परिस्थितीत मेकअपचे दिवसभर संरक्षण करणे फार कठीण जाते.
-
अनेकदा घामामुळे चेहऱ्यावर मेकअपचे पॅच तयार होतात आणि संपूर्ण लूक खराब होऊ लागतो. अशा परिस्थिती कोणत्याही कार्यक्रमाचा आनंद घेता येत नाही आणि मूड खराब होतो.
-
पण आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यातही तुमचा मेकअप बराच काळ टिकवून ठेवू शकता.
-
सर्वप्रथम मेकअप लावण्यापूर्वी तुम्ही प्राइमर वापरू शकता. त्याचा वापर केल्याने मेकअप दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. तुम्ही एखादं टिंटेड मॉईस्चराईझर वापरा. ज्यामुळे तुमची त्वचा एकसमान दिसेल आणि मऊदेखील राहील.
-
उन्हाळ्यात वॉटरप्रूफ मेकअप प्रोडक्ट्स वापरण्याचा प्रयत्न करा, कारण ते घाम आणि पाण्यापासून मेकअपचे संरक्षण करते. मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावर थोडी पावडर लावा, यामुळे तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही.
-
जर तुम्ही मस्करा आणि लायनर वापरत असाल तर लक्षात ठेवा की तेही वॉटरप्रूफ असावे. याशिवाय उन्हाळ्यात ब्लश, हायलायटर आणि ब्रॉन्झरचा वापर कमी करावा.
-
मेकअप करताना हलके फाउंडेशन वापरा. तुम्ही तुमच्या मेकअपला वेळोवेळी टच अप करत राहा.
-
तसेच मेकअप केल्यानंतर काही वेळानंतर तुम्ही चेहरा धुवू शकता. या सर्व टिप्सचा अवलंब करून तुम्ही मेकअप खराब होण्यापासून सहज रोखू शकता.
-
मेकअपच्या वापरामुळे काही लोकांना ऍलर्जी होण्याची शक्यता असते, म्हणून ते वापरण्यापूर्वी, नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. (photos creadit – freepik)

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा