-
पोटात दुखायला लागलं की, आई चिमूटभर ओवा हातात देते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
खरं तर पचनाच्या सर्व तक्रारींवर ओवा उत्तम गुणकारी आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
ओव्याचे सेवन करण्याची आणखीन एक सोपी पद्धत आहे ; थोडं पाणी घेऊन त्यात ओवा घाला आणि पाणी उकळून घ्या त्यानंतर हे पाणी गाळून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर कोमट ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन करण्याचे फायदे पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
प्रतिकारशक्ती वाढवते – ओव्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे ए आणि सी सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे ; जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. कोमट ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास आजारांपासून संरक्षण मिळू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पोटाची सूज आणि गॅस कमी करते – ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्यास पोटाची सूज आणि ओटीपोटात अस्वस्थता कमी होण्यास मदत करतात. यामुळे पचनास मदत होते, जेवणानंतर गॅसची समस्याही जाणवत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पचन सुधारणे – ओव्यामध्ये फायबर असते. ओव्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. हे अतिसार आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून बचाव करते. हे अपचन सारख्या पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
रक्तातील साखरेची पातळी – ओव्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासही मदत होते. कारण ओव्यामध्ये उच्च फायबर असते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
चयापचय वाढवते – रिकाम्या पोटी कोमट ओव्याचे पाणी प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया वाढू शकते तसेच वजन कमी करण्यासही मदत होते.(फोटो सौजन्य: @Freepik)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक