-
उन्हाळ्यात खूप तहान लागते. अशावेळी शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण फ्रीजमधील थंड पाणी पिण्यास प्राधान्य देतात. (Freepik)
-
तर काहीजण उन्हाळ्यात हायड्रेट्रेड राहण्यासाठी लस्सी, ताक, ज्यूस, नारळपणी, आम पन्ना या पेयांचे सेवन करणे पसंत करतात. (Pexels)
-
पण उन्हाळ्यात फ्रीजमधले थंड पाणी पिणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पण आरोग्यास हानी पोहोचू नये म्हणून सामान्य तापमानातील पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. (Freepik)
-
आयुर्वेदातही फ्रीजमधील थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे. कारण फ्रीजमधील थंड पाणी पिणे म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. (Pexels)
-
आज आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फ्रीजमधील थंड पाणी प्यायल्यास कोणकोणते तोटे होऊ शकतात, ते जाणून घेऊया. (Pexels)
-
आयुर्वेदानुसार, थंड पाणी प्यायल्याने पचनशक्ती कमजोर होते. पचनाला अग्नी मानले जाते आणि थंड पाणी या प्रक्रियेत अडथळा आणण्याचे काम करते. (Freepik)
-
पचनाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी उष्णता आवश्यक असते, जी तोंडापासून सुरू होते आणि आतड्यात संपते. पण थंड पाण्यामुळे या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. (Freepik)
-
तसेच, थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावून पचनाशी संबंधित समस्या सुरू होऊ शकतात. (Freepik)
-
फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने सर्दी होते, तसेच अनेकांना श्वासोच्छवासाचा त्रास होतो. यावेळी घसा खवखवणे, सर्दी आणि घसा खवखवण्याची समस्या जाणवू शकते. इतकंच नाही तर थायरॉईड किंवा टॉन्सिल ग्रंथींची वाढ होऊ शकते. (Freepik)
-
थंड पाण्याच्या सेवनाने शरीरातील हृदयाचे कार्य मंदावते. काही संशोधनानुसार, फ्रीजचे अधिक थंड पाणी प्यायल्याने दहाव्या क्रॅनियल नर्व्ह (व्हॅगस नर्व्ह) उत्तेजित होतात. थंड पाण्याचा थेट परिणाम व्हॅगस नर्व्हवर होतो, त्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात. जेवणानंतर लगेच प्यायल्याने अनेक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात. (Pexels)
-
कडक उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने डोकेदुखीची समस्या जाणवू शकते. थंड पाणी प्यायल्याने मणक्याच्या अनेक नसा थंड होतात, यामुळे मेंदूला ऑक्सिजन पोहचत नाही. परिणामी डोकेदुखी होते किंवा चक्कर येते. सायनसग्रस्त लोकांसाठी ही एक समस्या बनू शकते. (Freepik)
-
जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी थंड पाणी अजिबात पिऊ नये. थंड पाण्यामुळे शरीरातील फॅट बर्न करणे कठीण होते. (Pexels)
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Pexels)

IPL 2025: ‘हे’ २ संघ आयपीएलची फायनल खेळणार; माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी