-
जास्त उष्णता आणि उन्हाळ्यात वाढणारे तापमान यामुळे डिहायड्रेशन आणि पोटात जळजळ, उलट्या होणे, अशक्तपणा येते आदी समस्या जाणवू लागतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
घामाच्या धारा आणि वाढत्या उष्णतेमुळे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच त्रास जाणवायला सुरुवात झाली आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळे उन्हाळ्यात सतत पाणी पित राहण्याचा सल्ला दिला जातो. पण, पाण्याबरोबरचं आहारातही योग्य पदार्थांचा समावेश असणे गरजेचं आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुमच्या आहारात थंड पदार्थांचा समावेश केल्याने पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि तुमच्या पचनशक्तीला चालना मिळेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
उन्हाळ्यात पोटात होणारी जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील काही पदार्थांचा आहारात समावेश करून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
काकडी – काकडी ही नैसर्गिकरित्या थंडगार आहे ; जी तुमच्या पोटातील उष्णता कमी करण्यास आणि तुमचे पाचक आरोग्य सुधारण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पुदिना – उन्हाळ्यात तुमच्या खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये पुदिन्याचा समावेश करणे योग्य ठरेल. पुदिना पोटातील जळजळीला आराम देईल आणि पचनास मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दही किंवा योगर्ट – दही किंवा योगर्ट हे चांगल्या बॅक्टेरियाने समृद्ध असलेले प्रोबायोटिक्स आहेत ; जे आतड्याचे आरोग्य, पचन सुधारण्यास आणि पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नारळाचे पाणी – नारळाचे पाणी हे इलेक्ट्रोलाइट्सचे नैसर्गिक व उत्कृष्ट स्त्रोत आहे ; जे तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तसेच पोटातील उष्णता कमी करते आणि पचनासही मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”