-
Beauty Tips For Lips : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडून ओठ फुटतात हे समजू शकतो, मात्र उन्हाळ्यात ओठ फुटतात तेव्हा प्रश्न पडतो. (Photo: Freepik)
-
उन्हाळ्यात वातावरणातील ओलावाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते. ओलावा कमी झाल्यामुळे, ओठ कोरडे होण्याची प्रक्रिया सुरू होते. जर तुम्हीही फाटलेल्या ओठांनी त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Photo: Freepik)
-
फाटलेल्या ओठांवर नारळाचे तेल लावल्यास एक-दोन दिवसांत तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल.(Photo: Freepik)
-
सर्वप्रथम, तुम्हाला तुमचे ओठ कोमट पाण्याने धुवावे लागतील, तुमचे ओठ कोरडे करा आणि हलक्या हातांनी तेलाने मसाज करा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने धुवा आणि दोन दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल.(Photo: Freepik)
-
याशिवाय, कोरफड त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. फाटलेले ओठ मऊ करण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. (Photo: Freepik)
-
या दोन गोष्टींव्यतिरिक्त तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. जर तुम्हालाही फाटलेल्या ओठांचा त्रास होत असेल तर तुम्ही त्यावर मध लावू शकता.(Photo: Freepik)
-
मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. हे लावल्याने तुमचे ओठ मऊ राहतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याच्या मदतीने लिप बाम तयार करू शकता.(Photo: Freepik)
-
तुम्हालाही रूक्ष ओठांचा त्रास होत असेल. तर, दुधाची साय तुमची यातून सुटका करू शकेल. त्यासाठी दुधाची साय ओठांवर लावल्याने फायदा होतो.(Photo: Freepik)
-
हळद अनेक आजारांवर औषध म्हणून काम करते. ओठांना ठिक करण्यासाठीही हळद आणि दुधाची घट्ट पेस्ट बनवा.(Photo: Freepik)

“शासन भिकारी आहे”, कृषीमंत्री कोकाटेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद? फडणवीस नाराजी व्यक्त करत म्हणाले…