-
Benefits of Shrikhand: आपल्याकडे अतिशय आवडीनं खाल्लं जाणारं शाही पक्वान्न म्हणजे श्रीखंड. (फोटो : Freepik)
-
अगदी थोडक्यात वर्णन करायचं तर पाणी काढलेल्या दह्यात साखर आणि वेलची, केशर वगैरे घालून केलेला पदार्थ म्हणजे श्रीखंड.(फोटो : Freepik)
-
साध्या जेवणालाही शाही मेजवानीचं रुप देणाऱ्या श्रीखंडाचे आपल्या आरोग्यालाही फायदे आहेत. उन्हाळ्यात अनेकदा थंड पदार्थ खायला आवडतात, अशा परिस्थितीत श्रीखंड तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो.(फोटो : Freepik)
-
श्रीखंडामुळे पचनक्रिया सुधारते आणि गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. दह्यापासून बनवलेल्या श्रीखंडामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, जे हाडे मजबूत करण्यास खूप मदत करते.(फोटो : Freepik)
-
जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर तुम्ही रोज एक वाटी श्रीखंड सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.(फोटो : Freepik)
-
श्रीखंड खाल्ल्याने मन शांत होते आणि उन्हाळ्यात तणाव कमी होतो. दुपारी घराबाहेर पडल्यास बाजारातून श्रीखंड विकत घेऊन खाऊ शकता. असे केल्याने तीव्र उष्णता टाळता येते. (फोटो : Freepik)
-
उन्हाळ्यात शरीराला चिकटपणा जाणवतो. जर तुम्हाला चिकटपणा टाळायचा असेल तर तुम्ही श्रीखंडाचे सेवन करू शकता. त्यामुळे घाम येत नाही आणि शरीर थंड राहते.(फोटो : Freepik)
-
तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही फळासोबत श्रीखंड खाऊ शकता, याशिवाय तुम्ही नाश्त्यात किंवा स्नॅकच्या वेळीही श्रीखंड खाऊ शकता.(फोटो : Freepik)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”