-
बहुतेक लोकांच्या आहारात गव्हाचा समावेश असतो. सकाळी नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाल्ल्या जातात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पण, काही जणांना असे वाटते की, गव्हामध्ये ग्ल्यूटेन असते, त्यामुळे वजन वाढते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पण, गव्हाचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सिग्नस लक्ष्मी हॉस्पिटल येथील जनरल फिजिशियन ‘डॉक्टर संजय कुमार’ यांनी सांगितले आहे.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
गव्हात कॅलरीज: ३३९ kcal प्रति १०० ग्रॅम, कर्बोदके : ७२.६ ग्रॅम , आहारातील फायबर: १२.२ ग्रॅम, साखर: ०.४१ ग्रॅम ,प्रथिने: ११.३ ग्रॅम, फॅट (चरबी ): १.९ ग्रॅम असतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
गव्हामध्ये फायबर असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
गव्हातील उच्च फायबर सामग्री पचन सुलभ होण्यास, बद्धकोष्ठता टाळण्यास, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
गव्हामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
मधुमेह असणाऱ्या व्यक्ती त्यांच्या आहारात गव्हाचा समावेश करू शकतात. कारण गव्हातील फायबर सामग्री रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. पण, गव्हाचे आहारातील संतुलन महत्त्वाचे आहे.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
गर्भवती महिलांसाठी आहारात गव्हाचा समावेश फायदेशीर ठरेल. कारण ते बाळाच्या विकासासाठी आवश्यक असलेले फॉलिक ॲसिड, लोह आणि बी जीवनसत्त्वे यांसारखे आवश्यक पोषक घटक प्रदान करतात.(फोटो सौजन्य: @Freepik )

पुण्यातील कुंडमळ्यात पूल कोसळला; २० ते २५ जण बुडाल्याची शक्यता