-
अनेकदा कामाच्या तणावात आपण अनेक महत्वाच्या गोष्टी विसरून जातो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
काम करताना मोबाईल हातात घेतला की रिल्स स्क्रोल करत राहतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
घरात किंवा बाहेर असताना अनेकदा कित्येक गोष्टींचा विसर पडतो ; जे योग्य नाही आहे. जर आपण बारीक सारी गोष्टीही विसरत असू तर ही सवय टाळणेही आपलीच जवाबदारी आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनात या पाच उपायांचा समावेश नक्की करून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. ध्यान करा – ध्यान एकाग्रता वाढवण्यात आणि स्मरणशक्ती सुधारण्यास तुमची मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. स्मरणशक्ती वाढवणारे पदार्थ खा – स्मरणशक्ती सुधारण्यासाठी संत्री, बेरी,नट्स, बिया, ॲव्होकॅडो आणि पालेभाज्या यांचे सेवन करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. खेळ खेळा – स्मरणशक्ती वाढवण्यासाठी एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करणारे आवश्यक, मनोरंजक असे खेळ खेळा. तुम्ही रुबिक्स क्यूब किंवा बुद्धिबळ सुद्धा खेळू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. डायरी लिहा – डायरी लिहिणे तुमच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकते. तुम्हाला ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत असे वाटते त्या डायरीत नमूद करून ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. रात्री वेळेत झोपा – निरोगी मन, शरीर आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वेळेवर झोपणे अगदीच महत्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा