-
येत्या २१ जून रोजी देशात योग दिवस साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने कोणते योगा प्रकार केले पाहिजेत हे जाणून घ्या. (Photo: Freepik)
-
ताडासन : ताडासन हे आसन तुमचा तणाव दूर करण्यासाठी तसेच तुमच्या मेंदूला शांत करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तसेच या आसनामुळे शरीरावर तुमचा तोलही नीट राहतो.(Photo: Freepik)
-
त्रिकोनासन : हे पचन सुधारते आणि यकृत, स्वादूपिंड आणि पोटासाठी चांगले असते. पोट, कंबर, पाय आणि शरीराच्या बाजूच्या स्नायूंसाठी हे आसन करावे. तसेच पोटाची चरबीही कमी करते, मज्जातंतू शांत करण्यास मदत करते. कानाच्या समस्याही हे आसन केल्यानंतर दूर होण्यास मदत होते.(Photo: Freepik)
-
चक्रासन : सध्या चक्रासन या योगासन प्रकाराची जास्त चर्चा होते. चला तर चक्रासन हे योगासन सविस्तर जाणून घेऊ. चक्रासन हे एक उत्कृष्ट योगासन आहे, ज्याला इंग्रजीमध्ये व्हील योग पोझ असेही म्हणतात.(Photo: Freepik)
-
पादहस्तासन : हे आसन केल्याने पोटाच्या मांसपेशी निरोगी राहतात. स्नायू चांगले राहतात. पोटाशी संबंधित सर्व आजार दूर होण्यास मदत होते. यामुळे लठ्ठपणा आणि गॅसचा त्रास दूर होतो. शरीर लवचिक राहण्यास मदत होते. शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते.(Photo: Freepik)
-
शशांकासन : एक दीर्घ खोलवर श्वास भरून घ्यायचा व तोंडाने जोरात फुंकर मारत सोडून द्यायचा. थोडक्यात श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे हा विचार करायचा. क्षणभर का होईना खूप छान वाटतं. (Photo: Freepik)
-
वक्रासन: हे बसून करायचे आसन आहे. वक्र म्हणजे वाकडे. हे आसन करताना शरीर वक्र होते. या आसनामुळे पाठीच्या कण्याचा व्यायाम होतो. मानदुखी असलेल्यांनाही आराम मिळतो.(Photo: Freepik)
-
भुजंगासन : या आसनामुळे पोटाचे स्नायू ताणले जातात, त्यामुळे वाढलेलं पोट कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो. भुजंगासन करताना पोट ताणलेलं असताना चालू असलेल्या मंद श्वसनाचा उपयोग फुप्फुसांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो.(Photo: Freepik)
-
पवनमुक्तासन : पवनमुक्तासन या योगसाधनेतील एका आसनामुळे पोट सहज कमी करणं शक्य आहे. पवनमुक्तासनामुळे पोटाचा जडपणा कमी होतो, रक्तप्रवाह सुधारतो. चेतापेशी उद्दिपित होतात. (Photo: Freepik)

Pahalgam Terror: “ते मूर्ख लोक, त्यांना…” पहलगाम हल्ल्यावर एलॉन मस्क यांच्या वडिलांची प्रतिक्रिया