-
आता उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. यामुळे आता वेगवेगळे ज्सूस आणि स्मुदी याची मागणी वाढली आहे. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी कशी प्रकारे हेल्दी स्मुदी तयार करायची हे सांगणार आहोत.(फोटो : Freepik)
-
स्मुदीमध्ये फळे आणि भाज्या असतात ज्या सर्व महत्वाच्या पोषक घटकांनी परिपूर्ण असतात. उन्हाळ्याच्या हंगामात, बर्याच लोकांना सनबर्नची समस्या उद्भवते, ही स्मुदी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे.(फोटो : Freepik)
-
त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीराच्या विषाक्त पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम करतात. चला तर मग पाहूयात घरच्या घरी कशाप्रकारे हेल्दी स्मुदी तयार करायची.(फोटो : Freepik)
-
सर्वप्रथम स्मुदीसाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात.(फोटो : Freepik)
-
२ ते तीन गाजर मध्यम आकाराचे, १/२ लिंबू, १/२ इंच आले, मध आवश्यक असल्यास घ्यावे.(फोटो : Freepik)
-
कॅरट स्मुदी कृती, सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुऊन त्याचे वरील मुळांचे धागे काढून घ्यावेत. त्यांचे काप करून मिक्सरच्या भांड्यात घालून घ्या सोबत आले बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.(फोटो : Freepik)
-
त्यानंतर ग्लास भरून पाणी थोडे थोडे करून ओतावे आणि फिरवत रहावे. गाजर पूर्णपणे बारीक पेस्ट झाले पाहिजे त्यानंतर गाजर ग्लासमध्ये काढून त्यात लिंबू पिळावे.(फोटो : Freepik)
-
आता लिंबू पिळल्यानंतर थोडासा आंबटपणा त्याला येतो. म्हणून आवडत असल्यास मग त्यामध्ये घालावा किंवा मध न घालता ही हीच स्मुदी तुम्ही तशीच पिऊ शकता. (फोटो : Freepik)
