-
आवळ्याचे फायदे आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहेत, त्यात व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. आवळ्याचे पोषणमूल्य पाहता त्याला सुपरफूड असेही म्हणतात. (Photo: Freepik)
-
आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे. आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आयुष्य वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे.(Photo: Freepik)
-
आवळा सरबतात मध मिसळले तर अधिक चांगले. तसेच आवळा ज्यूसमुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते. चला तर हा आवळा सरबत घरच्या घरी कसा बनवायचा याची सोपी रेसिपी पाहुयात.(Photo: Freepik)
-
आवळा सीरप साहित्य पाहूयात, १ किलो आवळे१ किलो साखर, ५० ग्रॅम आले, ६ लिंबे, ३ कप पाणी, १ ग्लास सरबत सामग्री, २ टे स्पून आवळा सीरप, १ चिमुटभर मीठ, १ ग्लास थंड पाणी, पाचक सुपारी, आवळा, आल्याचा निघालेला चोथा, मिठ चवीनुसार, जीरे पूड (आॅप्शनल)(Photo: Freepik)
-
आवळे, लिंबू, आले स्वच्छ धुवून पुसून घ्यावे आले सोलून घ्यावे, लिंबू कापून बिया काढाव्या. आले, आवळे खिसावे. लिंबाचा रस काढून घ्यावा.आता मिक्सरच्या भांड्यात थोडा थोडा आवळ्याचा व आल्याचा खिस व लिंबाचा रस घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. हे वाटण एका भांड्यावर स्वच्छ रुमाल ठेवून वस्त्रगाळ करून रस काढावा.(Photo: Freepik)
-
आता निघालेल्या रसाचाच वापर पुढील वाटण करताना करावा. आले व लिंबाच्या एकत्रीतपणामुळे निघालेला रस हलका लालसर होतो म्हणून त्यात हिरवा फुड कलर घालून चांगले मिक्स करावे.(Photo: Freepik)
-
एका भांड्यात साखर व तीन कप पाणी घालून एक तारी पाक करावा. पाक कोमट झाल्यावर त्यात आवळा, आल्याचा रस गाळून ओतावा. मिश्रण चांगले ढवळावे.(Photo: Freepik)
-
तयार सीरप स्वच्छ बाटलीत भरून वर्षभरासाठी स्टोअर करावे. निघालेला चोथा टाकून न देता त्यात सैंधव मीठ,जीरे पूड घालून सुकवून पाचक सुपारी तयार होते. किंवा रोजच्या जेवणात भाजी, आमटी एक एक चमचा हा चोथा वापरल्यास त्याचे पोषण मुल्य मिळते.(Photo: Freepik)
-
सरबत तयार करण्यासाठी एका ग्लास मधे २टी स्पून आवळा सुपारी घालून त्यात थंड पाणी व चिमुटभर मीठ घालून चांगले मिक्स करावे.(Photo: Freepik)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या