-
Chicken handi recipe marathi: आज चिकनची एक स्पेशल रेसिपी ट्राय करा. या रेसिपीचं नाव आहे गावरान चिकन. ही रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायलाही छान लागते. अशा परिस्थितीत चला जाणून घेऊया गावरान चिकन कसे बनवायचे. (Photo: Freepik)
-
सर्वात आधी साहित्य घ्या, ५०० ग्राम चिकन, चिकन मॅरीनेट करण्यासाठी, १ टीस्पून काळीमिरी पूड, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, ग्रेव्हीसाठी २ टेबलस्पून तूप, २ मोठ्या कांद्याची पेस्ट, २ मोठे टोमॅटो (Photo: Freepik)
-
१०-१२ काजू, १ टेबलस्पून आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट, १ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून हळद, १०० ग्राम दही, १०० मि.ली पाणी, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून गरम मसाला, १ टेबलस्पून कसुरी मेथी (Photo: Freepik)
-
सर्वात आधी चिकनला काळीमिरी पूड, मीठ आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मॅरीनेट करा. त्यानंतर कांद्याची पेस्ट करून घ्या. टोमॅटो आणि काजूची पेस्ट करून घ्या. त्यानंतर एका भांड्यात तूप गरम करा, त्यात कांद्याची पेस्ट रंग बदलेपर्यंत परतून घ्या, त्यानंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून मिक्स करा.(Photo: Freepik)
-
२ मिनिटांनी त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घालून परतावे, चिकनचा रंग बदलला की त्यात, लाल तिखट, हळद आणि थोडी कस्तुरी मेथी घालून परतून घ्या.(Photo: Freepik)
-
२-३ मिनिटे परतल्यावर त्यात टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालून घ्या. आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात दही घालून घ्या आणि परत तेल सुटेपर्यंत थांबा.(Photo: Freepik)
-
नंतर त्यात पाणी घालून मिक्स करून घ्या. मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (Photo: Freepik)
-
आता यात गरम मसाला, परत थोडी कस्तुरी मेथी आणि बारिक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.(Photo: Freepik)
-
चिकन शिजले आहे मस्त तयार आहे. गरमगरम सर्व्ह करा आणि या पावसात या मसालेदार रेसिपीचा आनंद घ्या.(Photo: Freepik)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्