-
Tulsi Water Health Benefits: प्राचीन काळापासून एक पवित्र वनस्पती म्हणून दारी राहणाऱ्या तुळशीला विशेष मान आहे.
-
तुळशीचे (Tulsi Holy Basil) औषधी गुणधर्म सुद्धा अनेक आहेत, अगदी रोग प्रतिकारकशक्ती (Immunity) वाढवण्यापासून ते श्वसनाच्या समस्या सोडवण्यापर्यंत अनेक समस्यांवर तुळशीचे सेवन हे रामबाण उपाय ठरते.
-
विशेषत: पावसाळ्यात (Rainy Season) तर अनेकजण तुळशीच्या काढ्याला अमृतासमान मानतात.
-
आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशीची पाने पाण्यात टाकून पिणं म्हणजे तुळशीचं पाणी पिणं, हे इतकं साधं सोपं पेय आहे.
-
तुम्हाला पाण्यात पाने १० ते १५ मिनिटे भिजू द्यायची आहेत.
-
वाटल्यास तुम्ही मंद आचेवर काही वेळ हे पाणी पानांसहित उकळू शकता.
-
जास्त वेळ उष्णतेच्या संपर्कात पाने ठेऊ नयेत अन्यथा फायदे कमी होतात.
-
याशिवाय आपण अगोदरच उकळून घेतलेल्या पाण्यात तुळशीची ताजी पाने किंवा वाळवलेल्या तुळशीच्या पानांची पावडर करून मिसळू शकता.
-
हे एक नैसर्गिक डिटॉक्स पेय आहे, जे तुमच्या शरीराला स्वच्छ करते.
-
अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि इतर फायदेशीर पोषकसत्व असणाऱ्या या तुळशीचे पाणी आरोग्याच्या विविध समस्यांवर रामबाण उपाय मानले जाते.
-
तुळशीला अॅडप्टोजेन मानले जाते, याचा अर्थ तुळस शरीराला तणावाशी जुळवून घेण्यास आणि संतुलन राखण्यास मदत करते.
-
त्यामुळे ज्यांची जीवनशैली फार तणावग्रस्त आहे त्यांनी दिवसातून एकदा हे तुळशीचे पाणी प्यायल्यास फायदा होऊ शकतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
(हेही पाहा : पावसाळ्यात पालकाची भाजी करताना घ्या ‘ही’ काळजी)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा