-
कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, दिल्ली आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये डेंग्यूची प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे सगळीकडे डेंग्यूविषयी जगजागृती करून आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यास सांगितले जात आहे. (Photo : Freepik)
-
डेंग्यूची प्रमुख लक्षणे ताप, अंगदुखी आणि थकवा आहे; पण तज्ज्ञांच्या मते आता डेंग्यूमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यावर वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे, कारण मेंदूशी संबंधित दीर्घकाळ आजार धोकादायक ठरू शकतात. डेंग्यूचा मेंदूवर कसा परिणाम होतो? त्याची लक्षणे कोणती व यावर कोणते उपचार घ्यावेत? या विषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती सांगितली आहे. (Photo : Freepik)
-
जनरल मेडिसिन व फिजिशियन डॉ. पलेती शिवा कार्तिक रेड्डी (MBBS,MD) सांगतात, “ताप, अंगदुखी या डेंग्यूच्या लक्षणांपलीकडे डेंग्यूचा परिणाम मेंदूवरसुद्धा होतो. डेंग्यूचा व्हायरस न्यूरोट्रॉपिक आहे, म्हणजेच त्याचा थेट संबंध मज्जासंस्थेशी (nervous System) आहे. (Photo : Freepik)
-
डेंग्यूचा व्हायरस जेव्हा मेंदूच्या आत जातो, तेव्हा काय घडते? हा व्हायरस जेव्हा मेंदूमध्ये शिरतो, तेव्हा मेंदूतील पेशी खराब होतात, ज्यामुळे मेंदूचे कार्य बिघडते. (Photo : Freepik)
-
जेव्हा व्हायरस मेंदूमध्ये शिरतो तेव्हा शरीर रोगप्रतिकारशक्तीचा वापर करतो, त्यामुळे मेंदू आणि पाठीच्या कणामध्ये त्रास जाणवतो आणि तेथील टिश्यू खराब होतात. (Photo : Freepik)
-
अनेक प्रकरणांमध्ये डेंग्यूमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया (thrombocytopenia) होऊ शकतो. थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजेच शरीरातील रक्ताच्या पेशी कमी होतात आणि मेंदूमधून रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. (Photo : Freepik)
-
डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये मेंदूशी संबंधित समस्या ही एक प्रमुख चिंता आहे. डॉ. रेड्डी सांगतात, “ही सर्व निरीक्षणे वैज्ञानिक संशोधनातून समोर आली आहेत, जे डेंग्यूचा थेट संबंध मेंदूवर होत असल्याचे सांगतात. तसेच जागरूकता पसरविणे आणि सतर्क राहण्याचा सल्लासुद्धा डॉ. रेड्डी देतात.” (Photo : Freepik)
-
या दरम्यान सतत हृदयाची धडधड वाढणे, मान दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. तीव्र डोकेदुखी दिसून येते.या दरम्यान रुग्णाची दिशाभूल होऊ शकते. त्यांना एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. त्यांची मानसिक स्थिती सतत बदलू शकते. (Photo : Freepik)
-
स्नायूंमध्ये अनियंत्रित हालचाली जाणवू शकतात. या लोकांना अशक्तपणा जाणवू शकतो. नीट व स्पष्ट न दिसणे हे लक्षणसुद्धा दिसू शकते. (Photo : Freepik)

“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल