-
अनेकदा खूप गरम झालं किंवा तहान लागली तर आपण थंड पाण्याची बाटली, थंडगार पेय, किंवा कोल्ड कॉफी दुकानातून विकत घेतो. या कोल्ड कॉफी दुकानात बाटलीबंद असतात. पण, या तुमच्या आरोग्यसाठी सुरक्षित असतात का ? (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर हेच जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या पोषण व आहारशास्त्र विभागाच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ डॉक्टर मोनल वेलांगी यांच्याशी संवाद साधला. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
मार्केटमध्ये मिळणाऱ्या बंद बाटलीतील कोल्ड कॉफीमध्ये सरासरी १५ ग्रॅम प्रति १०० मिलिलिटर साखर असते. या साखरेमुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वाढ होऊन इन्सुलिन वाढू शकते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
बाटलीबंद कोल्ड कॉफी वारंवार प्यायल्याने रक्तातील इन्सुलिनची पातळी वारंवार वाढू शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास, त्यामुळे रक्तातील साखर वाढून टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर इन्सुलिन पातळी कमी करण्याचे सोपे उपाय पुढीलप्रमाणे : यासाठी तुम्ही शुगर फ्री कोल्ड कॉफी हा पर्याय निवडू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
दुसरा म्हणजे पॅकबंद कोल्ड कॉफी पिण्यापूर्वी किंवा ऑर्डर करण्यापूर्वी एक वाटी सॅलड खा. कारण- सॅलडमधील फायबर इन्सुलिनची वाढ कमी करण्यास मदत करील, असे पोषणतज्ज्ञ गरिमा देव वर्मन यांनी सांगितले आहे. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
शुगर फ्री कोल्ड कॉफी ही प्रतिकप सुमारे १/४ चमचा डिकॅफिनेटेड कॉफीसह पिणे हा चांगला पर्याय ठरेल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
कोणी कोल्ड कॉफीचे सेवन करू नये?
मधुमेहींनी कॉफी पिणे पूर्णपणे टाळले पाहिजे आणि ३० किंवा ५० च्या वयाच्या निरोगी व्यक्तींनी दैनंदिन भोग म्हणून नाही, तर अधूनमधून ट्रीट म्हणून ही कॉफी प्यावी. (फोटो सौजन्य : @Freepik) -
कॉफीचे पहाटे किंवा रात्री उशिरा सेवन करणाऱ्या बहुतेक लोकांना कमी ग्लुकोज, प्री-डायबेटिस आणि मधुमेहामुळे ग्रस्त असलेल्या लोकांना अशा स्पाइकचा अधिक धोका असतो. (फोटो सौजन्य : @Freepik)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक