-
सोशल मीडियावर निरोगी आरोग्यासाठी अनेक जण घरगुती उपाय सांगत असतात. काही वेळा हे उपाय खरोखरच फायदेशीर आहेत का, हे पडताळून पाहणे आव्हानात्मक ठरते. (Photo : Freepik)
-
विशेषत: मधुमेहाचा आजार असलेल्या लोकांना हे अधिक कठीण जाते. कारण- त्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप कठोर वाटणारा असा आहार घ्यावा लागतो. (Photo : Freepik)
-
न्युट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांनी मधुमेह असलेल्या लोकांमध्ये असलेले काही सामान्य गैरसमज सांगितले आहेत. (Photo : Freepik)
-
त्याविषयी नवी दिल्ली येथील एनएफसी आर्टेमिस लाइटच्या न्यूट्रिशनिस्ट संगीता तिवारी यांच्याशी दी इंडियन एक्स्प्रेसने संवाद साधला आणि सविस्तर माहिती जाणून घेतली. (Photo : Freepik)
-
चहा न पिणे
चहा विशेषत: ग्रीन टी आणि काळा चहा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करणाऱ्या अँटिऑक्सिडंट्ससह आरोग्यासाठी फायदेशी आहे. “चहा पूर्णपणे बंद करणे गरजेचे नाही. जेव्हा तुम्ही कमी प्रमाणात चहाचे सेवन करता, तेव्हा साखर कमी टाकलेला चहा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगल्या आहाराचा भाग ठरू शकतो”, असे तिवारी सांगतात. (Photo : Freepik) -
विनाकारण भात खाणे टाळणे
भात मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतो. “भातासह भाज्या व प्रोटीन एकत्र केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते”, असे तिवारी सांगतात. (Photo : Freepik) -
फळे न खाणे
मधुमेहाचा आजार असलेले काही लोक साखरेमुळे फळे खाणे टाळतात. “फळांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व फायबर असतात, जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. अशा वेळी बेरी, सफरचंद इत्यादींसारखी कमी ग्लायसेमिक इंडेक्स (glycemic index) असलेली फळे निवडावीत”, असे तिवारी पुढे सांगतात. (Photo : Freepik) -
विविध प्रकारचे रस पिणे
फळांचे रस हे नैसर्गिक साखरेपासून तयार होत असले तरी त्यामुळे रक्तातील साखरेची मात्र वाढ होऊ शकते. फळे हा एक चांगला पर्याय आहे. कारण- त्यात फायबर असते आणि त्यामुळे शरीर जास्त साखर शोषून घेत नाही. पण, जर तुम्हाला फळांचा रस आवडत असेल, तर कमी रस प्या किंवा त्यात थोडे पाणी टाका आणि त्यानंतर प्या”, असे तिवारी सांगतात. (Photo : Freepik) -
CGM उपकरणांचा अति वापर करणे
सीजीएम (Continuous Glucose Monitoring)सारख्या उपकरणांवर जास्त अवलंबून राहू नका. त्यामुळे स्ट्रेस वाढू शकतो आणि आहारावर निर्बंध येऊ शकतात.
आरोग्य तपासणीसाठी CGM डेटा वापरणे महत्त्वाचे आहे; पण त्याचा वापर चांगल्या आणि संतुलित आहारासाठी करणे आवश्यक आहे, असे तिवारी सांगतात. (Photo : Freepik)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा