-
एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. अंडे हे प्रोटीनचे मोठे स्त्रोत आहे. त्यामुळे अंड्यापासून बुर्जी, ऑम्लेट, अंडा मसाला आदी विविध पदार्थ बनवले जातात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्याचप्रमाणे उकडलेल्या अंड्यात हेल्दी फॅट असते, जे वजन वाढू देत नाही. अंड्यात असलेले व्हिटामिन डी सर्दी पासून बचाव सुद्धा करते.(फोटो सौजन्य : @Freepik)
-
पण, बाजारातून आणलेली अंडी फ्रेश आहेत की खराब हा प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर तुम्हाला सुद्धा अंडी फ्रेश आहेत की खराब हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही पुढील पाच पद्धतींचा वापर करू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
अंडी खराब आहेत की नाही हे ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अंडी पाण्यात टाकून त्याची चाचणी करणे. अंडी खराब असतील तर ती पाण्यावर तरंगतात आणि जर अंडी ताजी असतील तर ती पाण्यात बुडतात. त्यामुळे तुम्ही बाजारातून अंडी आणून पाण्यात टाकू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
ताज्या अंड्याचा आवाज होत नाही. कारण त्यातले पाण्याचे प्रमाण कमी असते. पण, जुने अंडे हलवल्यावर आवाज येतो. त्यामुळे जर तुम्हाला आवाज ऐकू आला, तर ते अंडे जुने असू शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
ताजे अंडे गडद रंगाचे आणि वजनदार असतात, पण जुने अंडे वजनाला हलके असतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
ताज्या अंड्याला अजिबात वास येत नाही, याउलट खराब अंड्याला वास येण्याची शक्यता जास्त असते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
ताज्या अंड्यांच्या पांढऱ्या भागाला (व्हाइट) आणि पिवळ्या भागाला (योक) गोलसर आकार असतो. जुने अंडे पाण्यासारखे दिसतात आणि पिवळा भाग अधिक सपाट असतो. (फोटो सौजन्य : @Freepik)

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश