-
आजच्या काळातील व्यग्र जीवनशैलीमुळे शरीराची योग्य ती काळजी घेतली जात नाही. परिणामी शरीर निरोगी राहू शकत नाही.
-
बहुतेक कामे आज स्क्रीनवरूनच केली जात असल्याकारणाने डोळ्यांवर खूप ताण पडतो.
-
डोळ्यांवर ताण म्हणजे कमी दिसणे, भुरकट दिसणे, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळते. या आजारांमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर बराच परिणाम होतो.
-
डोळ्यांच्या या त्रासापासून वाचायचे असेल, तर रोजच्या आहारामध्ये पुढील घटकांचा समावेश करणे फायद्याचे ठरेल.
-
मेथीच्या दाण्याचे पाणी – दिनचर्येची सुरुवात मेथीच्या दाण्यांच्या पाण्याने केली, तर ते फायदेशीर ठरेल.
-
मेथीचे दाणे क जीवनसत्त्वाने भरपूर असल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. मग वय वाढले तरी डोळ्यांची दृष्टी कायम चांगली राहू शकते.
-
बदाम – बदामामध्ये ई जीवनसत्त्वाचा समावेश असल्यामुळे ते आपल्याला डोळ्यांचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून वाचवते. रात्रभर भिजवलेल्या पाण्यात ठेवलेले बदाम खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते, तसेच स्मरणशक्तीही वाढते.
-
आवळा – आवळ्यामध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांच्या विकारापासून आराम मिळतो.
-
बीटरूट – बीटरूटमध्ये अ जीवनसत्त्व असल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. बीटरूटचे सेवन सकाळच्या नाश्त्यात किंवा त्याचा रस काढून केले जाऊ शकते.
-
(सर्व फोटो सौजन्य ; पेक्सएल्स )

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया