-
तुम्हाला रात्री लवकर जेवण करण्याचे फायदे माहितीयेत का? दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. (Photo : Freepik)
-
दिल्लीच्या सी. के. बिर्ला हॉस्पिटल येथील मिनिमल अॅक्सेस, जीआय व बॅरिअॅट्रिक सर्जरीचे संचालक डॉ. सुखविंदर सिंग सग्गू सांगतात, “रात्री शारीरिक क्रिया मंदावतात.
त्यामुळे रात्री उशिरा जेवण करण्यापेक्षा सूर्योदय आणि सूर्यास्त यादरम्यान जेवण करावे. कारण- यादरम्यान अन्नाचे चांगल्या रीतीने पचान होते. त्यामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्यसुद्धा चांगले राहते. (Photo : Freepik) -
डॉ. सग्गू पुढे सांगतात, “दिवसातून तुमचे पहिले अन्न उठल्यानंतर सुमारे दीड तासाने आणि तुमचे शेवटचे अन्न झोपण्यापूर्वी २-३ तास आधी घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये थोडा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी घ्यावे. एकंदरीत अशा प्रकारे आहार घ्यावा.” (Photo : Freepik)
-
तज्ञांच्या मते, अशा तऱ्हेने आहार घेतल्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. रक्तातील साखर नियंत्रित राहते, कोलेस्ट्रॉलची पातळी म्हणजेच उच्च एचडीएल (चांगले) आणि हानिकारक एलडीएल यांच्यावर नियंत्रण राहते. (Photo : Freepik)
-
त्याशिवाय जेवण लवकर केल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आणि आजारांचा धोका कमी होतो, अशी माहिती डॉ. सग्गू पुढे सांगतात. (Photo : Freepik)
-
आहारात हलके व पौष्टिक पदार्थ घ्या; ज्यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल. या पदार्थांचे अतिसेवनसुद्धा करू नये. (Photo : Freepik)
-
प्रत्येक गोष्टीचे योग्य ते प्रमाण ठरवून, त्यानुसार सेवन करा. तुम्हाला किती भूक लागली आहे, याचा नेहमी विचार करा आणि त्यानुसार स्नॅक्स खा; जेणेकरून तुमचे पोट भरेल. (Photo : Freepik)
-
भरपूर पाणी प्या. कारण- कधी कधी डिहायड्रेशनमुळेही भूक लागली आहे, असे वाटू शकते. (Photo : Freepik)
-
शरीराला कोणत्या पौष्टिक घटकांची आवश्यकता आहे, याकडे लक्ष द्या. तुम्ही चांगले पौष्टिक स्नॅक्स निवडून, दिवसभर निरोगी आहार घेऊ शकता. (Photo : Freepik)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल