-
भारताला आकर्षक समुद्रकिनाऱ्यांची देणगी लाभली आहे. विविध भागांमध्ये पसरलेले हे नयनरम्य समुद्रकिनारे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छता आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहेत.
-
उन्हाळ्यात बीचवर फिरण्यात अनोखी धमाल अनुभवायला मिळत असते.
-
पॅलोलेम बीच- गोवा येथील पॅलोलेम बीच गोलाकार वाळूचा किनारा आणि शांत समुद्र यांमुळे पर्यटकांना आरामदायक अनुभव मिळतो.
-
पुरी बीच- ओडिशातील पुरी बीच एक प्रसिद्ध आणि स्वच्छ किनारा आहे. येथे शांत वातावरण आणि सुंदर सूर्यास्त अनुभवता येतो. पुरीच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वामुळे हा किनारा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
-
तारकर्ली बीच- महाराष्ट्रातील तारकर्ली बीच एक अप्रतिम आणि स्वच्छ किनारा आहे. येथील पारदर्शक पाणी आणि शांत वातावरण यांमुळे पर्यटकांना निसर्गाची खरीखुरी अनुभूती मिळते.
-
अगत्ती बेट- अगत्ती बेट हे लक्षद्वीपमधील एक अप्रतिम बेट आहे. येथील पांढरी वाळू आणि निळेशार पाणी यांमुळे या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अद्वितीय आहे. अगत्ती बेटावर पोहोचण्यासाठी विशेष परवानगी आवश्यक आहे.
-
गोकर्णा बीच, कर्नाटका गोकर्णा शहरात विविध स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. येथील कुडले बीच आणि ओम बीच स्वच्छतेसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. या किनाऱ्यांवर शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येते.
-
वर्कला बीच, केरळ इथे उंच डोंगर आणि समुद्राचे दृश्य एकत्रितपणे अनुभवता येते. वर्कला बीच धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळेही ओळखला जातो.
-
राधानगर बीच, राधानगर बीच, अंदमान व निकोबार बेटे येथे एक अप्रतिम सफेद वाळूचा किनारा पाहायला मिळतो. त्याच्या स्वच्छ आणि निळ्याशार पाण्यामुळे हे किनारे ‘भारतातील सर्वांत स्वच्छ समुद्रकिनारे’ म्हणून ओळखले जातात. येथील सूर्यास्ताचे दृश्य हे विशेष आकर्षण आहे.
-
मारारी बीच, केरळ
मारारी बीच, केरळमधील एक शांत आणि स्वच्छ किनारा आहे. इथे कमी गर्दी आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना आरामदायक अनुभव मिळतो. -
वरील सर्व समुद्रकिनारे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छता आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स, पिंटरेस्ट)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल