-
१. असे मित्र जोपासा, जे मनाने निर्मळ आणि विचारांनी स्पष्ट असतील. त्यांच्या सहवासात असताना मन हलकं वाटतं, कारण ते कुणाविषयीही वाईट बोलत नाहीत आणि कुणालाही कमी लेखत नाहीत. त्यांच्या नम्र स्वभावामुळे ते आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतात.
-
२. संकटातही सत्याचा मार्ग सोडू नका. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांना यश नक्की गवसतं.
-
३. जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर आळस झटकून द्या, आव्हानांना सामोरे जा आणि मेहनतीपासून कधीच मागे हटू नका.
-
४. ज्या व्यक्ती स्वार्थासाठीच जवळ येतात, आपले कार्य पूर्ण झाल्यावर उपकार विसरतात, अशा लोकांपासून त्वरित अंतर राखावे, कारण जे उपकार मानत नाहीत, ते संकटकाळी साथ देत नाहीत.
-
५. विद्या हेच खरे भांडवल आहे. धन लुटले जाऊ शकते, पण विद्या कधीच हरवत नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे, तो प्रतिकूल परिस्थितीतही यशाचे शिखर गाठू शकतो.
-
६. आचार्य चाणक्य यांच्या मते, काळ हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे, जो वेळेचा अपव्यय करतो, तो आयुष्याचा अपमान करतो. यशस्वी तोच ठरतो जो प्रत्येक क्षणाचे मोल जाणतो आणि त्याचा योग्य उपयोग करतो.
-
७. दुर्बलाशी दया ठेवावी, पण शक्तिशालींच्या सान्निध्यात विवेक राखावा. दयाळूपणा हे सद्गुण आहे, पण अंध दया मूर्खपणाकडे नेते. प्रत्येकाशी वागताना बुद्धी, संयम आणि सावधगिरी आवश्यक आहे.
-
८. भूतकाळात रमणारा कधीच यशस्वी होत नाही. यश प्राप्त करावयाचे असल्यास वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागते. भविष्य घडते ते आजच्या कर्तव्यातूनच.
-
९. यश हे सदैव परिश्रमींच्या पाठीशी असते. भाग्य तेव्हाच साथ देते, जेव्हा पुरुषार्थ प्रामाणिक असतो. आळस करणारा नशिबावर अवलंबून असतो, पण परिश्रमी त्याचे नशीब स्वतः घडवतो.
-
१०. विश्वास आवश्यक आहे, परंतु तो विवेकाने करावा. अंधविश्वास नेहमीच विनाशाचे कारण ठरतो. प्रत्येक गोष्टीची परीक्षा घ्या, मगच विश्वास ठेवा.

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”