-
शुक्र (Venus) ग्रह हा सुख-समृद्धी, प्रेम, सुंदरता, सुखी वैवाहिक जीवनाचा कारक आहे.
-
वैदिक ज्योतिष्यशास्त्रानुसार संपत्ती, समृद्धी आणि विलासी जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो.
-
धन, सौंदर्य आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र ग्रह २६ जून २०२५ रोजी सूर्याच्या कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करतोय. हा नक्षत्रपरिवर्तन काही राशींवर विशेष कृपादृष्टी घेऊन येणार आहे.
-
या काळात तीन राशीच्या लोकांचं नशीब जबरदस्त चमकणार आहे. त्यांना आयुष्यात सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचं आता फळ मिळू शकतं. व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे.
-
शुक्र ग्रहाचं नक्षत्र प्रवेश सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकतो. तुमचं एखादं स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हं आहेत. प्रलंबित कामे पूर्ण होऊन उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढीची संधी मिळू शकते.
-
तूळ राशीच्या मंडळींना शुक्राच्या कृपेने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या काळात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. घर, गाडी किंवा जमीन खरेदीची संधी मिळू शकते. या राशींचे लोक दागिन्यांची खरेदीही करु शकतात. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल.
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Darsh Amavasya Horoscope: आज १२ पैकी कोणत्या राशींना लाभेल दुप्पट पुण्य तर कोणाला होईल लाभच लाभ; वाचा राशिभविष्य