-
अनेकांना सकाळी उठल्याबरोबर एक कप चहा घेतल्याशिवाय तरतरी जाणवत नाही. सकाळची सुरुवातचं त्यांची चहाने होते.
-
चहामुळे खरोखरच आपल्याला काही फायदा होतो का की फक्त मूड सुधारण्यासाठी चहा कामी येतो यावर अनेकांनी वेगवेगळी मते दिली आहेत. पण सगळ्याच तज्ज्ञांचं काही मुद्द्यांवर मात्र एकमत आहे.
-
तो मुद्दा म्हणजे चहाबरोबर काय खाऊ नये? अनेकदा आपल्याला चहा प्यायल्यावर अचानक करपट ढेकर येऊ लागतात, कधी ऍसिडिटी वाढते, या सगळ्याचं खापर चहावर फोडलं जात असलं तरी काही वेळा आपण चहाच्या जोडीला खाल्लेला बिस्कीटाचा पुडा, भज्या याच ऍसिडिटीचं कारण ठरू शकतात.
-
आज आपण आहारतज्ज्ञ गौरी आनंद, संस्थापक @balancedbitesbygauri यांनी सांगितल्याप्रमाणे चहाचे सेवन करताना नेहमी टाळाव्या अशा ६ पदार्थांची यादी पाहणार आहोत.
-
चहामध्ये लिंबाचा तुकडा घालणे फायदेशीर ठरू शकते, परंतु चहाच्या जोडीने मोठ्या प्रमाणात लिंबूवर्गीय फळांचे (संत्री, मोसंबी) सेवन केल्याने पचन समस्या उद्भवू शकतात.
-
या फळांमध्ये जास्त आंबटपणा असल्यामुळे चहामधील टॅनिनसह ते छातीत जळजळ किंवा अपचन वाढवू शकतात. तसेच फळांमधील किंचित तुरटपणा पचनमार्गात त्रास होऊ शकतो.
-
पालक, लाल मांस आणि शेंगा यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर लोह असते, जे तुमच्या शरीरासाठी आवश्यक असते. पण, चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स ही संयुगे असतात
-
जे नॉनहेम लोह (वनस्पती-आधारित पदार्थ आणि पूरक पदार्थांमध्ये आढळणारे लोहाचे प्रकार) शोषण्यास अडथळा निर्माण करू शकतात.
-
लोहाचे जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी आपण चहाच्या वेळेव्यतिरिक्त या पदार्थांचे सेवन करावे.
-
चहाबरोबर मसालेदार पदार्थ खाल्ल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल त्रास वाढू शकतात. चहामधील टॅनिन पोटाच्या अस्तरांना त्रास देऊ शकतात.
-
मसालेदार पदार्थांतील कॅप्सॅसिनसह मिसळल्यास पोटात आम्लता, अपचन आणि छातीत जळजळ होऊ शकते.
-
विशिष्ट पालेभाज्या (उदा. केल, कोलार्ह, रव्या भाज्या) हे पदार्थ अधिक कॅल्शियमयुक्त असतात. हेच कॅल्शियम अँटिऑक्सिडंट्सना बांधायचे काम करते त्यामुळे कॅटेचिनसारख्या घटकांच्या शोषणात व्यत्यय येऊ शकतो. चहाबरोबर हे पदार्थ खाल्ल्याने त्याचा फायदा शरीराला मिळतच नाही.
-
चहामध्ये सुद्धा साखर असते अशावेळी चहा आणि वर स्नॅक्समधील साखर असे प्रमाण जास्त झाल्यास मेटाबॉलिक सिंड्रोम आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.
-
प्रक्रिया केलेल्या पदार्थामुळे किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमुळे ग्लायसेमिक भार वाढतो परिणामी रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होऊ शकते.
-
गरम चहाबरोबर थंड पदार्थ अजिबातच खाऊ नयेत. कारण विरोधाभासी तापमान पचनक्रियेत व्यत्यय आणू शकते. एकाच वेळी वेगवेगळ्या तापमानाचे अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया विस्कळीत होऊ शकते आणि मळमळ होऊ शकते.
-
हे टाळण्यासाठी, दोन्हीच्या सेवनात किमान ३० मिनिटांचे अंतर ठेवा.
-
आनंद सांगतात की, “ चहाचा मूळ प्रकार म्हणजे काळ्या चहामध्ये टॅनिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे लोहाचे शोषण होण्यात व्यत्यय येतो आणि लोहयुक्त किंवा जास्त आम्लयुक्त पदार्थ खाल्ल्यास पाचन समस्या निर्माण होतात.”
-
दुसरा चहाचा प्रकार म्हणजे ग्रीन टी ज्याची किंचित कडू चव असते आणि त्यात मध्यम प्रमाणात टॅनिन असते. हलके, ताजे पदार्थ जसे की सॅलड्स आणि मासे यांच्यासह ग्रीन टीचे सेवन फायद्याचे ठरू शकते.
-
पण उच्च अँटिऑक्सिडेंट टिकवून ठेवण्यासाठी ग्रीन टी दुग्धजन्य पदार्थांसह घेणे टाळा (Photo Credit : freepik, pixabay )

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान