-
काकडी केव्हा खावी?
काकडी सकाळी किंवा दुपारी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, विशेषतः उन्हाळ्यात. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि पचनही सुधारते. -
मीठ घालून खाणं योग्य आहे का?
काकडीवर थोडं मीठ टाकणं काही लोकांसाठी उपयोगी ठरू शकतं, विशेषतः ज्यांना पोट फुगण्याची समस्या आहे. पण मीठ प्रमाणातच वापरा, कारण जास्त मिठामुळे सोडियम वाढतो. -
रात्री काकडी खाल्ल्यास चालते का?
काकडी रात्री खाण्याचा कुठलाही धोका नाही. काही लोकांना पचनास त्रास होतो, पण सगळ्यांना नाही. पचन चांगलं असेल, तर संध्याकाळी काकडी खाणं आरामदायक असतं. -
काकडी आणि दही एकत्र चालतं का?
दह्यासोबत काकडी खाणं सुरक्षित आहे. दोघांमध्ये फायबर, हायड्रेशन आणि प्रोबायोटिक्स असतात, जे पचनासाठी चांगले ठरतात. -
काकडी खाण्याची योग्य पद्धत
काकडी खाण्यापूर्वी ती नीट धुवा आणि शक्य असल्यास सोलून खा. ज्यांचे पचन कमजोर आहे त्यांनी बिया काढून टाकाव्यात, यामुळे पचायला सोपे जाते.

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान