-
मधुमेहाच्या रुग्णांची संख्या केवळ भारतातच नाही तर जगभरात झपाट्याने वाढत आहे. हा एक असाध्य आजार आहे जो खाण्याच्या वाईट सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो. (Photo: Freepik)
-
मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग्य आहार घेणे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे. तसेच आयुर्वेदानुसार, त्यावर नियंत्रण मिळवणेही शक्य होऊ शकते. (Photo: Unsplash)
-
आयुर्वेद ही भारतातील पारंपरिक वैद्यकीय प्रणाली आहे जी आजच्या काळात अधिकाधिक लोक पुन्हा स्वीकारताना दिसत आहेत. आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. यासोबतच, सर्वात गंभीर आजारांवरही आयुर्वेदाद्वारे उपचार करता येतात. (Photo: Freepik)
-
रक्तातील साखर आणि चयापचयाचे संतुलन राखण्यासाठी आयुर्वेद आहारात काही पदार्थांचा समावेश करण्याची शिफारस करतो. चला जाणून घेऊया: (Photo: Freepik)
-
आवळा
आवळा हा व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे आणि स्वादुपिंड मजबूत करण्यास मदत करतो, ज्यामुळे शरीरात इन्सुलिनचे योग्य उत्पादन होण्यास मदत होते. (Photo: Freepik) -
सेवन करण्याची योग्य पद्धत:
सकाळी आवळ्याचा रस पिणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, पावडर आणि सॅलडच्या स्वरूपात देखील सेवन केले जाऊ शकते. (Photo: Freepik) -
मेथी:
मेथीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय ठरू शकतो. मेथीमध्ये विरघळणारे फायबर असते जे कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करतो, ज्यामुळे अन्न हळूहळू पचते. व रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढत नाही. (Photo: Freepik) -
सेवन कसे करावे:
मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. (Photo: Freepik) -
कारलं
कारल्यामध्ये कॅरॅन्टीन आणि पॉलीपेप्टाइड-पी नावाचे विशेष संयुगे असतात जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. (Photo: Unsplash) -
कारलं कसं खाव:
सकाळी रिकाम्या पोटी त्याचा रस पिणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. (Photo: Freepik) -
हळद
आयुर्वेदात हळदीचा वापर औषध म्हणून केला जातो. त्यात कर्क्यूमिन नावाचे संयुग असते जे जळजळ कमी करते आणि शरीरात इन्सुलिन संवेदनशीलता वाढविण्यास मदत करते. (Photo: Unsplash) -
कसे सेवन करावे:
सकाळी कोमट पाण्यात किंवा दुधात हळद मिसळून सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. (Photo: Pexels) -
दालचिनी
दालचिनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील रामबाण उपाय ठरू शकते. ती पचनक्रिया जलद करते आणि इन्सुलिन संवेदनशील बनवते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी लवकर नियंत्रित होते. (Photo: Pexels) -
कसे सेवन करावे:
दालचिनीची चहा पिऊन किंवा पाण्यात उकळून तुम्ही तिचे फायदे मिळवू शकता. याशिवाय, तुम्ही ते तुमच्या जेवणात देखील समाविष्ट करू शकता. (Photo: Pexels) हेही पाहा- तणावमुक्त राहण्यासाठी दैनंदिन जीवनात ‘या’ सोप्या १० गोष्टींवर काम करा…

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय