-
नाश्ता हा आपल्या दिवसाच्या चांगल्या सुरुवातीसाठी अतिशय महत्वाचा असतो. परंतु बरेच लोक त्यांच्या सवयी, वेळ नसल्यामुळे किंवा उपवासाच्या कारणाने नाश्ता करणं टाळतात. नाश्ता न करणे हे काहीवेळा फायद्याचं असू शकतं पण असं दररोज केलं तर त्याचे तुमच्या शरीरावर लक्षणीय परिणाम होतात. (Photo: Unsplash)
-
रक्तातील साखरेचे चढउतार: नाश्ता न केल्याने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ लागते, ज्यामुळे थकवा, चिडचिड आणि लक्ष केंद्रित करण्याच्या अडचणी येऊ शकतात. याशिवाय कालांतराने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमतेतही वाढ होऊ शकते. (Photo: Unsplash)
-
भूक वाढते- जेव्हा तुम्ही नाश्ता करत नाही तेव्हा तुमचे शरीर दिवसाच्या शेवटी जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाऊन त्याची भरपाई करते, ज्यामुळे तुम्ही जेवण जास्त प्रमाणात खाता. (Photo: Unsplash)
-
कार्यप्रक्रियेवर परिणाम: सकाळच्या नाश्ता नसेल तर एकाग्रता, स्मरणशक्ती आणि उत्पादकता या गोष्टींमध्ये कमतरता येऊ शकते. विद्यार्थी आणि कामगारांनी दिवसाच्या सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्यातील कार्यक्षमता कमी झाल्याचे जाणवू शकते. (Photo: Unsplash)
-
दीर्घकालीन हृदयरोगाचे धोके: संशोधनानुसार नियमित नाश्ता न केल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. (Photo: Unsplash)
-
मंदावलेली चयापचय क्रिया: सकाळी नाश्ता केल्याने तुमचे पचनचक्र सुरू होण्यास मदत होते. नियमितपणे नाश्ता न केल्याने कॅलरी बर्निंग कमी होऊ शकते, ज्यामुळे काही लोकांसाठी वजनाचे गणितही बिघडू शकते. (Photo: Unsplash)
-
मूड स्विंग्स आणि चिडचिड: रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास चिडचिड, ताण किंवा चिंता देखील वाढू शकते. नाश्ता त्वरीत ऊर्जा आणि मूड स्थिर करण्यास मदत करतो. (Photo: Unsplash) हेही पाहा- कोणत्याही औषधाची आवश्यकता नाही! फुफ्फुसांना नैसर्गिकरित्या स्वच्छ करण्याचे ४ जबरदस्त उपाय…

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE : सरकारकडून मागण्या मान्य, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं