-
काहीजण रात्री उशिरा जेवतात. तर काहींना रात्री झोपायच्या आधी काहीतरी खायची इच्छा होते. परंतु, ते आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. अगदी फळं, सुका मेवा किंवा इतर हेल्दी स्नॅक्स (पौष्टिक पदार्थ) खाणं देखील आरोग्यासाठी वाईटच मानलं जातं. झोपायच्या काही मिनिटे आधी काहीही खाणं आरोग्यदायी नसतं. रात्री उशिरा किंवा झोपायच्या आधी काही खाल्लं तर त्याने आरोग्यावर काय परिणाम होतात ते आपण जाणून घेणार आहोत. (Photo Source : unsplash)
-
जैविक घड्याळ बिघडते (Circadian Rhythm) : रात्री शरीराचं मेटाबॉलिझम कमी झालेलं असतं आणि ते विश्रांती किंवा दुरुस्तीच्या अवस्थेत असतं. अशावेळी काहीतरी खाल्ल्याने शरीराला जागं राहण्याचा सिग्नल मिळतो आणि हार्मोन्सचं नैसर्गिक चक्र बिघडतं. आपल्या शरिराचं जैविक घड्याळ बिघडतं. (Photo Source : unsplash)
-
अपचन वाढते : रात्री पचनक्रिया मंदावते. उशिरा खाल्ल्याने अपचन, पोटफुगी, अॅसिडिटी (पित्त) होऊ शकते, ज्यामुळे नीट झोप लागत नाही आणि पचनशक्ती कमी होते. (Photo Source : unsplash)
-
रक्तातील साखरेवर परिणाम : रात्री उशिरा खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढते. या वेळेस शरीर साखर नीट नियंत्रित करू शकत नाही, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिकार (insulin resistance) वाढून मधुमेहाचा धोका वाढतो. (Photo Source : unsplash)
-
चरबी वाढते : उशिरा ग्रहण केलेल्या कॅलरीज ऊर्जा म्हणून वापरल्या जात नाहीत, तर शरीरात चरबी म्हणून साठवून ठेवल्या जातात. ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. काहीजण वजन वाढू नये म्हणून सुका मेवा, स्मूदीसारखे पौष्टिक स्नॅक्स घेतात. परंतु, तेदेखील रात्री खाल्ल्यास वजन वाढू शकतं. (Photo Source : unsplash)
-
झोपेची गुणवत्ता कमी होते : झोपण्याआधी खाल्ल्याने मेलाटोनिन हार्मोन कमी होते, ज्यामुळे झोप लागायला आणि टिकायला त्रास होतो. म्हणजेच झोप लागली तरी ती गाढ झोप नसते. आपण मध्येच जागे होतो. खराब झोपेमुळे पुन्हा भूक वाढते आणि मेटाबॉलिझम बिघडतं, ज्यामुळे थकवा व जास्त खाण्याचं चक्र तयार होतं. दिवसभर आपण कंटाळलेले असतो. (Photo Source : unsplash)
-
हृदयदाह (Heartburn) आणि GERD (Gastroesophageal Reflux Disease) चा धोका : खाल्ल्यानंतर आपण लगेच आडवे झालो (झोपणे, लोळणे) तर पित्त वाढून छातीत जळजळ होते किंवा GERD चा धोका बळावतो. तुम्ही पौष्टिक पदार्थ खाल्ले तरी हे धोके टळत नाहीत. (Photo Source : unsplash)

भारतातील IT क्षेत्र चिंतेत; अमेरिकेत आउटसोर्सिंगविरोधात विधेयक सादर, लाखो नोकऱ्या जाण्याची भीती