-    आजच्या तणावपूर्ण जगात, मन शांत ठेवण्यासाठी, एकाग्र ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवले जातात, काही लोक तर औषधं घ्यायला सांगतात. परंतु, भारतीयांच्या काही प्राचीन सवयी, ध्यान व प्राणायाम तुम्हाला शांत राहण्यासाठी व एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करतील. आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. (Photo Source – Freepik) 
-    स्पष्टता (clarity) मिळवण्यासाठी, आपल्याला नवीन कोणते तरी उत्पादकतेचे तंत्र शिकण्याची आवश्यकता नाही,असं योग शिक्षक व तज्ज्ञ सौरभ बोथ्रा यांनी सांगितलं. त्यांचा विश्वास आहे की आपल्याला केवळ शांती हवी आहे, त्यापेक्षा फार काही अपेक्षा नसते. मात्र या शांतीसाठी ते आपल्याला प्राचीन सवयी आपल्या रोजच्या जीवनात समाविष्ट करण्याचा सल्ला देतात, ज्यामुळे आपली एकाग्रता वाढते. ते म्हणतात की आपले पूर्वज रोजच्या जीवनात ध्यान आणि मनाचं पोषण करण्यासाठी विविध सवयींचा अवलंब करायचे. (Photo Source – Freepik) 
-    त्राटक ध्यान 
 हे एक प्राचीन योगिक तंत्र आहे, ज्यामध्ये आपल्याला एका मेणबत्तीच्या जळणाऱ्या ज्योतीकडे बघायचं असतं, आणि डोळ्यांच्या पापण्या मिटायच्या नाहीत. यामुळे दृश्य एकाग्रता वाढते आणि मन शांत होते. सौरभ बोथ्रा सांगतात की फक्त ५ मिनिटे दररोज याचा सराव केल्याने मानसिक स्पष्टता वाढू शकते. (Photo Source – Freepik)
-    नसाग्र दृष्टी 
 हे एक प्राचीन तंत्र आहे ज्याचा उपयोग एकाग्रता वाढवण्यासाठी केला जातो. यामध्ये विशिष्ट योगासनं आणि ध्यानामध्ये आपल्या नाकाच्या टोकाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. हे तंत्र आपल्या विचारांना केंद्रित करण्यास मदत करते.(Photo Source – Freepik)
-    नाडी शोधन 
 हे श्वासोच्छ्वासाचं तंत्र आहे, जो डाव्या आणि उजव्या मेंदूचे संतुलन साधतो, ऊर्जा वाहिन्या स्वच्छ करतो आणि आपल्याला एकाच वेळी शांत तरीही जागरूक ठेवतो. सौरभ बोथ्रा हे तंत्र कामापूर्वी किंवा अध्ययनाच्या आधी करण्याची शिफारस करतात. (Photo Source – Pexels)
-    ब्रह्मारी प्राणायाम 
 या तंत्रात मृदू आवाजात ह्म्म्म्म करत श्वास घेतला जातो, ज्यामुळे मानसिक गोंधळ कमी होतो. उच्च एकाग्रता आवश्यक असलेल्या कामांच्या आधी याचा अभ्यास करणे फायदेशीर ठरते. (Photo Source – Pexels)
-    मंत्रोच्चार 
 ‘ॐ’ किंवा ‘सो-हम’ यांसारख्या मंत्रांचा नियमित उच्चार केल्याने आपले मन स्थिर राहते, अगदी आपल्या विचारांना स्थिरता मिळते.(Photo Source – Pexels)
-    योगासने 
 वृक्षासन आणि गरुडासन यांसारखी स्थिरता आणि संतुलन आवश्यक असलेली योगासनं एकाग्रता सुधारतात. योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या आसनांचा अभ्यास करत असताना आपण फोकस्ड होतो. आपली एकाग्रता वाढते. (Photo Source – Freepik)
-    अनवाणी पायाने गवतावर चालणे 
 पायता चपला, बूट न घालता अनवाणी पायाने गवतावर चालणं हे देखील संतुलनासाठी चांगलं तंत्र मानलं जात. यामुळे नर्व्हस सिस्टिम संतुलित होते, आपला मूड सुधारतो, मानसिक गोंधळ कमी होतो. (Photo Source – Pexels)
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  