-
एका नवीन टिकटॉक आणि इंस्टाग्राम ट्रेंडमध्ये असा दावा करण्यात आला आहे की तुमच्या भुवयांवर क्लॉ क्लिप (केसांना लावायचा चाप) लावल्याने डोकेदुखी आणि मायग्रेन देखील थांबू शकतं. हे फक्त इंटरनेटवरील नवीन फॅड आहे की ही आयडिया खरंच काम करते? हा प्रयोग करण्यापूर्वी याची सत्यता तपासून बघा. तसेच तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे ते जाणून घ्या. (Photo Source : instagram and unsplash)
-
व्हायरल ट्रेंड
भुवया किंवा कपाळावर क्लिप्स लावलेले फोटो व रील्स व्हायरल होत आहेत आणि असे फोटो-व्हिडीओ व्हायरल करणारे युजर्स डोकेदुखी त्वरित कमी होत असल्याचा दावा करत आहेत. (Photo Source : instagram and unsplash) -
काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की या क्लिप्स भुवयांजवळ डोक्याजवळ हलका दाब निर्माण करतात. याने अॅक्यूप्रेशर पॉइंट्स दाबले जातात, त्यातून कपाळाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि डोकेदुखी कमी होते. (Photo Source : instagram and unsplash)
-
या ट्रेंडचं समर्थन करणारे दावा करत आहेत की या क्लिप्स अॅक्यूप्रेशर पॉइंट्सवर दाब निर्माण करतात. (Photo Source : instagram and unsplash)
-
लक्ष देण्यासारखे धोके
या अशा घट्ट क्लिप्समुळे त्वचेला त्रास होऊ शकतो, केस ओढले जाऊ शकतात आणि यातून वेदना वाढू शकते. अशा क्लिप्सवर व व्हायरल ट्रेंडवर जास्त अवलंबून राहिल्याने वारंवार होणाऱ्या डोकेदुखीचं खरं निदान होण्यास विलंब होऊ शकतो.(Photo Source : instagram and unsplash) -
तज्ज्ञांचं म्हणणं काय?
डॉक्टर आणि न्यूरोलॉजिस्टनी याबाबत इशारा दिला आहे की ही कृती डोकेदुखी किंवा मायग्रेनवर प्रभावीपणे उपचार करू शकते याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.(Photo Source : instagram and unsplash) -
डोकेदुखीवर उपचार करण्याचा योग्य मार्ग काय?
हायड्रेशन, विश्रांती, ताणाचं व्यवस्थापन हे डोकेदुखीवर उपचार करण्याचे योग्य मार्ग आहेत. डोकेदुखी वारंवार होत असेल किंवा तीव्र डोकेदुखी (मायग्रेन) असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते.(Photo Source : instagram and unsplash)
Photos: गौतमी पाटीलचे घर पाहिलेत का? दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोंमधून दाखवली झलक