-
मधुमेह असलेल्या लोकांसाठी, रात्रीच्या वेळी रक्तातील साखरेचे चढउतार व्यवस्थापित करणं कठीण असू शकतं. रात्रीच्या वेळी हायपोग्लायसेमिया किंवा सकाळी लवकर हायपरग्लायसेमिया नियंत्रित करण्यासाठी पहाटे ३ वाजता रक्तातील साखरेची पातळी तपासली जाते. ते का महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला याबद्दल काय माहित असलं पाहिजे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (PC – Unsplash)
-
पहाटे वाजता साखरेची पातळी तपासणं म्हणजे काय?
पहाटे ३ वाजता साखरेची पातळी म्हणजे या वेळेला तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण तपासणं, तुम्ही झोपेत असताना साखरेची पातळी कमी किंवा जास्त होतेय का ते पाहणं. (PC – Unsplash) -
पहाटे ३ वाजताच्या असामान्य रीडिंग्सचे व्यवस्थापन कसे करावे?
रात्री संतुलित आहार घ्या. रात्री उशिरा गोड पदार्थ व साखरेचं प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाणं टाळा. इन्सुलिन डोस किंवा औषधं वेळेवर घ्या. (PC – Unsplash) -
पहाटे ३ वाजता रक्तातील साखर जास्त असेल तर?
पहाटे ३ वाजता रक्तातील साखर जास्त असेल आणि सकाळी देखील ती जास्तच राहिली तर ते कॉर्टिसोल आणि ग्रोथ हार्मोन्समुळे घडतं. (PC – Unsplash) -
पहाटे ३ वाजता रक्तातील साखर कमी असेल तर?
पहाटे ३ वाजता रक्तातील साखर ७० मिलीग्रॅम/डीसीएलपेक्षा कमी असेल, तर ते जास्त इन्सुलिन, रात्रीचे जेवण वगळणे किंवा संध्याकाळी जास्त व्यायाम यामुळे होणारे हायपोग्लायसेमिया दर्शवू शकते. (PC – Unsplash) -
पहाटे ३ वाजता तपासणी का करावी?
डॉक्टर रात्रीचे हायपोग्लायसेमिया किंवा पहाटेच्या घटनेची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी पहाटे ३ वाजता चाचणी करण्याची शिफारस करतात. (PC – Unsplash) -
डॉक्टरांना कधी भेटावं?
सातत्याने पहाटे तीन वाजता रक्तातील साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त जाणवत असेल, सकाळी डोकेदुखी, थकवा किंवा अनियंत्रित मधुमेह निदर्शनास आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. (PC – Unsplash)

Afghanistan : पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धामागे भारताचा हात? इस्लामाबादच्या आरोपांवर तालिबानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…