-
हल्ली आपण खूपदा बाहेरुन खरेदी केलेला पनीर खातो. पण असे करणे आरोग्याच्या दृष्टिने हानिकारक ठरु शकते, बाहेरचा पनीर खाण्याचे काही तोटे जाणून घेऊयात. (Photo: Unsplash)
-
अस्वच्छ ठिकाणी बनवलेला पनीर बॅक्टेरिया दूषित असण्याची शक्यता असते. त्यामुळे तो खाल्ल्यास विषबाधा किंवा संसर्ग होऊ शकतो. (Photo: Unsplash)
-
अयोग्य पद्धतीने हाताळल्यास आणि साठवल्यास पनीर दूषित होतो. (Photo: Unsplash)
-
अनेक ठिकाणी विक्रेते भेसळ असलेले किंवा पाणी मिसळलेले दूध वापरुन पनीर बनवतात. त्यामुळे त्यातील पौष्टिक घटकांटचे नुकसान होते. याशिवाय असा पनीर खाणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. (Photo: Unsplash)
-
हॉटेलमधील पनीरमध्ये अनेकदा तेलाचं प्रमाण जास्त असतं, मलई आणि बटरही अधिक वापरले जाते. त्यामुळे पनीर खाणं हानिकारक बनतं. (Photo: Unsplash)
-
मॉल्समध्ये पनीर जास्त काळ टिकावा यासाठी केमिकल संरक्षक वापरले जातात. जे आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहचवू शकतात. (Photo: Unsplash)
-
अधिक काळ बनवून ठेवलेले पनीर फ्रीजरमधून बाहेर काढताच खूप लवकर खराब होते. त्यामुळे असा पनीर खाल्ल्यास त्यापासून गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात. (Photo: Unsplash)
-
काही ठिकाणी पनीर कमी खर्चात तयार व्हावा यासाठी दूध पावडर, स्टार्च वापरले जातात. जे पचनासाठी हानिकारक असतात. त्याचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागू शकतात. (Photo: Unsplash)
-
त्यामुळे घरीच ताजे पनीर बनवून खाणे कधीही योग्य. (Photo: Unsplash)
हेही पाहा- Clove Tea Benefits: जेवणानंतर लवंग घातलेला चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे…

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…