-
नाश्ता हा दिवसाच्या सुरुवातीला सर्वात महत्त्वाचा असतो. दरम्यान, किडनीच्या समस्या असलेल्या लोकांसाठी, दिवसाच्या सुरुवातीला चुकीचा नाश्ता निवडल्याने मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि म्हणूनच, असे पदार्थ नाश्त्यामध्ये खाणे टाळले पाहिजे. (Photo: Canva)
-
इन्स्टंट नूडल्स किंवा पॅकेज्ड ब्रेकफास्ट: बरेच लोक सकाळी तयार इन्स्टंट नूडल्स किंवा पॅकेज्ड नाश्ता करणे पसंत करतात, परंतु अशा पदार्थांमध्ये सोडियम आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे ते किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरतात. (Photo: Canva)
-
प्रक्रिया केलेले मांस (बेकन, सॉसेज, हॅम): प्रक्रिया केलेले मांस सोडियम आणि प्रिझर्वेटिव्ह्जने भरलेले असते, जे रक्तदाब वाढवू शकते आणि मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. त्यात फॉस्फरस अॅडिटीव्ह देखील असतात जे हळूहळू मूत्रपिंडाचे नुकसान वाढवत जातात. (Photo: Canva)
-
चीज-लोडेड सँडविच आणि ऑम्लेट: चीजमध्ये फॉस्फरस, सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण खूप जास्त असते. दिवसाची सुरुवात चीज-लोडेड पदार्थांनी केल्यास फॉस्फरसची पातळी वाढू शकते, ज्यामुळे मूत्रपिंडांना फिल्टर करण्यास अडचण निर्माण होते. (Photo: Canva)
-
पॅक केलेला फळांचा रस आणि स्मूदी: फळे आरोग्यदायी असली तरी, कॅन केलेला रस आणि दुकानातून खरेदी केलेल्या ड्रींक्समध्ये सहसा साखर आणि पोटॅशियमयुक्त फळे जसे की केळी आणि संत्री जास्त प्रमाणात असतात, जे मूत्रपिंडाचे कार्य बिघडलेल्या लोकांसाठी धोक्याचे ठरू शकतात. (Photo: Canva)
-
पेस्ट्री, केक आणि डोनट्स: नाश्त्यासाठी गोड असलेल्या या पदार्थांमध्ये साखर, खराब चरबी आणि रिफाइंड पीठ भरपूर प्रमाणात असते. जास्त साखरेचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोकाही वाढतो, जो किडनीच्या आजाराचे एक प्रमुख कारण आहे. त्यामध्ये अनावश्यक पोषक तत्वांशिवाय बिनकामाच्या कॅलरीज देखील असतात, म्हणून त्यांना टाळळे पाहीजे. (Photo: Canva)

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”