-
कुठेही बाहेर न जाता तुम्ही फक्त सोफ्यावर बसूनही वर्कआऊट करू शकता, अशा सहा वेगवेगळ्या व्यायामांच्या प्रकाराबाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. (Photo Source by unsplash )
-
आर्म सर्कल्स व पंचेस (Arm Circles and Punches) : आर्म सर्कल्स व पंचेस हे शरीराच्या वरच्या भागासाठीचे व्यायाम प्रकार आहेत. आर्म सर्कल्स म्हणजे हातांना वर्तुळाकार फिरवणे, जे खांद्याचे स्नायू गरम करण्यासाठी आणि लवचिक करण्यासाठी तुम्ही करू शकता. यामुळे स्नायू अधिक कार्यक्षम होतात.(Photo Source by unsplash)
-
कॅल्फ राईज (Calf Raise) : कॅल्फ राईज हा एक व्यायाम आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पायांच्या बोटांवर उभे राहून टाचा वर उचलून पोटरीचे स्नायू मजबूत करू शकता. पिंडऱ्यांचे स्नायू टोन होतात. (Photo Source by unsplash )
-
काऊच प्लँक व्हेरिएशन्स : हा एक व्यायामाचा प्रकार आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने करण्यासाठी सोफ्यासारख्या पृष्ठभागाचा वापर करू शकतात. सोफ्याच्या काठावर हात ठेवा, पाय मागे घेऊन तुम्ही हा व्यायाम करू शकता.या व्यायामांमुळे पोटाचे आणि मुख्य स्नायू बळकट होतात.(Photo Source by unsplash)
-
सोफ्यावरून उठून बसा: सोफ्यावरून उठून १० ते १५ वेळा बसा. त्यामुळे पायांचे स्नायू बळकट होतात आणि तुम्हाला सक्रिय ठेवतात. (Photo Source by unsplash)
-
बसून पाय उचलणे: सोफ्यावर बसताना एका वेळी एक पाय उचला, काही सेकंद धरा आणि हळूहळू खाली करा. मग दुसरा पाय उचला काही सेकंद वर धरा आणि हळूहळू खाली करा. यामुळे पायांचे स्नायू बळकट होतात.(Photo Source by unsplash)
-
सीटेड मार्शे : ही एक शारीरिक हालचाल आहे, जी बसलेल्या स्थितीत केली जाते. यात पायांची हालचाल करणे, पाय हलवणे किंवा गुडघे आळीपाळीने उचला. यामुळे रक्ताभिसरण वाढवते आणि तुमचे स्नायू बळकट होतात.(Photo Source by unsplash)

मी आंबेडकरी, ‘आरएसएस’च्या विजयादशमी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही…, सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई कमलताईंचे स्पष्टीकरण